महात्मा गांधी संकुलात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.
लोहगाव (वार्ताहर):
राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी संकुलात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य अंगद काकडे मुख्याध्यापिका सिंधू क्षेत्रे, प्रभारी पर्यवेक्षक संजय ठाकरे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा संगीता उगले यांच्या हस्ते लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वैष्णवी तांबे, संजना साळवे प्राचार्य अंगद काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा संगीता उगले यांनी आपल्या मनोगतातून महापुरुषांच्या कार्याला व आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी सुभाष भुसाळ यांच्यासह विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमांमध्ये प्राचार्य अंगद काकडे, उपप्राचार्य अलका आहेर आणि विद्यार्थी यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. शरद दुधाट यांनी केले. यावेळी प्राचार्य काकडे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, अण्णाभाऊ साठे हे वास्तववादी साहित्यिक होते. त्यांचे प्रबोधनपर साहित्य वाचकांच्या हृदयांपर्यंत पोहोचणारे साहित्य आहे. यावेळी त्यांनी श्रमप्रतिष्ठेचा आणि कार्याचा गौरव करून श्रमाचे जीवनातील विशद केले.
.