Breaking
ब्रेकिंग

रक्षाबंधनला छत्तीसगड येथील साई माऊली परिवाराकडून 35 किलो वजनाची 36 फूट लांब व पाच फूट रुंद अशी भव्य राखी साईबाबांना समर्पित?

0 9 1 3 8 2

 

शिर्डी ( प्रतिनिधी)

आज सोमवार रक्षाबंधना निमित्‍त छत्तीसगडमधील बिलासपूर येथील साईमाऊली परिवाराकडून शिर्डीत श्री प्रबोधराव यांनी येऊन श्री साईबाबांना साधारण ३५ किलो वजनाची ३६ फुट लांब व ०५ फुट रुंद अशी भव्‍य राखी बनवून ती साईबाबांना समर्पित केली. या बद्दल प्रबोधराव यांनी सांगितले की, ही राखी कलाकार दिलीप दिवाकर पात्रीकर यांनी १० दिवसांत बनवली असून यामध्ये फायबर प्लाय, मोती, जरी, बुटी आदींचे काम करण्यात आले आहे. श्री साईनाथांनी लक्ष्मीबाईंना दिलेली नऊ नाणींची थीम या राखीमध्ये समाविष्ट केली आहेत. प्रत्येक नाणे श्रीमद

भागवत आणि श्री रामचरितमानस यांच्या नवविधा भक्तीचे एक वैशिष्ट्य दर्शवते, तेच या राखीमध्ये समाविष्ट केले आहे. या राखीचे श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ वंदिना गाडीलकर, उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ ज्‍योती हुलवळे तसेच राखी देणगीदार साईभक्‍त प्रबोधराव यांचे हस्‍ते विधीवत पुजन करणेत आले. यावेळी मंदिर विभागप्रमुख विष्‍णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बिलासपूर येथील साई माऊली परिवाराचे श्री प्रबोधराव व त्यांच्या परिवाराचा साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शाल, प्रसाद देऊन त्यांचा संस्थांनतर्फे सत्कार केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे