Breaking
ब्रेकिंग

तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांना घरकुल मंजूर. अरुण खरात यांच्या पाठपुराव्याला यश.

0 9 1 3 8 2

 

शिर्डी (सत्तेचा महासंग्राम न्युज)

राजेंद्र दूनबळे..

 

एकेकाळी आपल्या अंगी असलेल्या नृत्य व गायन ह्या कलेद्वारे तमाशाचे फड गाजवणाऱ्या लावणी सम्राज्ञी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील शांताबाई कोपरगावकर यांच्यावर वृद्धपकाळामुळे खूपच हलाखीची परिस्थिती निर्माण झाली होती निराधार बेघर असलेल्या शांताबाई वर उपासमारीची वेळ आली होती कोपरगाव चे बस स्टँड त्यांचे घर झाले होते तिची ही सर्व व्यथा सामाजिक कार्यकर्ते कलाप्रेमी अरुण खरात यांनी सोशल मीडियावर मांडल्यानंतर शासन, प्रशासन राजकीय मंडळी व सामाजिक संस्था यांचे सर्वांचे लक्ष शांताबाई कडे गेले त्यांना मदतीचा ओघ चालू झाला त्यांना वृद्ध आश्रमात तात्पुरता निवारा मिळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शांताबाईला पाच लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत करून त्यांचा सत्कारही केला तत्पूर्वी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी वृद्धाश्रमात येऊन शांताबाईची प्रत्यक्ष भेट घेतली व विचारपूस करून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घरकुल बाबत निर्देश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी यांनी वृद्धाश्रमात जाऊन शांताबाई चा घरकुल मागणी अर्ज भरला व तो प्रशासकीय मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला होता परंतु त्यानंतर घरकुला संदर्भात खूपच दिरंगाई होत असल्याने. सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची वेळोवेळी भेट घेत त्यांना लेखी पत्र देत नंतर लेखी स्मरणपत्र देत आयुष्यभर बेघर राहिलेल्या शांताबाई ला या उतार वयात तरी गृह सौख्य लाभावे व हक्काचा निवारा मेळावा याकरता घरकुलाच्या मंजुरीसाठी सतत पाठपुरावा करत राहिले अखेर आता शांताबाई अर्जुन लोंढे यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असून नगरपरिषदेचे अभियंता हर्षवर्धन सुराळकर यांनी सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांना नुकतेच घरकुल मंजुरीचे पत्र दिले आहे.

 

 

चौकट.. ( शांताबाई कोपरगावकर यांचे होणारे घरकुल हे कोपरगावच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणाऱ्या व कोपरगावचे नावलौकिक वाढवलेल्या शांताबाई चे भविष्यात सतत स्मरण देणारे व कलाकारांना प्रेरणा देणारे ठरणारे आहे तसेच लोककला अभ्यासक व संशोधक यांच्या दृष्टीने ही ते महत्त्वाचे ठरणारे आहे. शांताबाई ला शासनाकडून मिळालेली आर्थिक मदत व घरकुल हे माझ्या प्रयत्नांचे यश असून त्यामुळे मला आत्मिक समाधान व आनंद मिळाला आहे — सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात )

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे