प्रवरेच्या इन्स्टिट्यूट ऑफ एग्रीकल्चर ॲड डेअरी सायन्सच्या चार विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड.
लोणी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे इन्स्टिट्युट ऑफ एग्रीकल्चर अँड डेअरी सायन्सेस, लोणी येथील ४ विद्यार्थ्यांची युनायटेड बायो एनर्जी,जुन्नर पुणे या कंपनी मध्ये प्रसाद पलघडमल,प्रतीक दुबे ,प्रसाद खर्डे,क्षितिज पठारे यांची मार्केटिंग प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य एस. बी.जोंधळे यांनी दिली.
आज कृषी क्षेत्रातील कंपनी मध्ये मोठी करीअर संधी उपलब्ध होत आहे. महाविद्यालय पातळीवर विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम सुरु आहेत. विविध जनजागृती कार्यक्रम, माजी विद्यार्थी संघटना यामुळे ग्रामीण मुलांना मोठी संधी मिळत आहे. याशिवाय व्यक्तीमहत्व विकास,बद्दलते नवे तंञज्ञान,विविध विषयांवर चर्चासञे,प्रक्षेञ भेटी याव्दारे विद्यार्थी घडत असल्याने नोकरीमध्ये प्रवरेच्या मुलांना मोठी मागणी आहे. युनायटेड बायो एनर्जी प्रा.ली.जुन्नर पुणे कंपनीमध्ये प्रसाद पलघडमल,प्रतीक दुबे ,प्रसाद खर्डे,क्षितिज पठारे यांची निवड झाली आहे.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, खा डॉ. सुजय विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, कृषि संलग्नित महाविद्यालयांचे संचालक डॉ.उत्तमराव कदम ,प्राचार्य एस.बी.जोंधळे, संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख मनोज परजणे, विद्यालयाचे प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा.जे.बी. ब्राम्हणे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.