Breaking
ब्रेकिंग

सरकारी जागेवरील निवासी अतिक्रमण नियमानुकुल करुन घरकुलाचा प्रश्न सोडावावा … बापुसाहेब शिंदे

0 9 1 3 8 1

 

टाकळी भान(सत्तेचा महासंग्राम न्युज)

तरी घरकुलाच्या लाभार्थ्यांना घरकुल मंजुर असुनही खाजगी जागेचा निकष सरकार दरबारी लावल्याने गोरगरीबाचे पक्या घराचे स्वप्न हवेत विरत असल्याने सरकारी जागेवरील निवासी अतिक्रमण नियमानुकुल करुन घरकुलाचा प्रश्न सोडवावा या प्रमुख मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब शिंदे यांनी श्रीरामपुर तहसिल कचेरी समोर पुकारलेले बेमुदत आमरण उपोषण तहसिलदार यांनी दिलेल्या आश्वासना नंतर सोडण्यात आले.

सरकारी जागेवर गेली १००ते १५० वर्षांपासुन निवासी अतिक्रमण करुन गोरगरीब राहत आहेत. विविध योजनेतुन गरीबाना देण्यात येणाऱ्या घरकुलांच्या जागेच्या निकषात बदल करण्यात आल्याने घरकुलाचा प्रश्न गभीर झालेला आहे. गेली अनेक वर्षे लाभार्थ्याला घरकुल मंजुर होवुनही खाजगी जागा नसल्याने घरकुल बांधता येत नाही. या ज्वलंत प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब शिंदे यांनी आवाज उठवण्यासाठी श्रीरामपुर येथील तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते.

यावेळी माजी नगर सेवक अशोक कानडे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, उपाध्यक्ष प्रा. कार्लस साठे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, भाजपाचे बबनराव मुठे व विविध संघटनांच्या वतीने पाठींबा देण्यात आला होता.शंभरापेक्षा जास्त लाभार्थी या उपोषणात सहभागी झाले होते. श्रीरामपुरचे तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या आदेशानुसार नायब तहसिलदार श्रीमती काकडे यांनी उपोषणस्थळी भेट देवुन आपल्या मागण्यांची दखल घेत त्या वरीष्ठ पातळीवर पोहचवल्या जातील मात्र आपण उपोषण सोडावे आशी विनंती केल्याने सर्व संमतीने उपोषण सोडण्यात आले.

यावेळी सुरेश आसने, भास्करराव कोकणे, अनिल बोडखे, नारायण काळे, दादासाहेब कापसे, बंडोपंत बोडखे, सुरेश पवार, गजानन कोकणे, श्रीधर गाडे, बाबासाहेब तनपुरे, मधुकर गायकवाड, रामनाथ माळवदे, अनिता तडके, सुनिल पटारे, आनिल कोकणे, नारायण पिंजारी, शरद रणनवरे, रामा शिंदे, दिपक पवार, आदींसह महीला व पुरुष लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

चौकट ——–

—————

तालुक्याचे आमदार लहु कानडे यांनी विधानसभेच्या गेल्या अधिवेषणात सरकारी जागेवरील निवासी अतिक्रमण नियमानुकुल करण्याचा प्रश्न उपस्थित केला होता. घरकुलाच्या जागेसाठी हा प्रश्न उपस्थित झाल्याने तालुक्यातील अनेक मंजुर घरकुल पडुन आहेत. त्यामुळे गोरगरीबाच्या नावाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विधानसभेच्या पावसाळी आधिवेषणातही हा प्रश्न आ. कानडे उपस्थित करुन ही निवासी अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठी प्राधान्याने काम करणार आहेत.

अशोकनाना कानडे — माजी नगरसेवक.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे