कुणाल गायकवाड यांच्यासह आठ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
कुणाल गायकवाड यांच्यासह आठ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल
शासनमान्य वाळू उत्खननाला विरोध ;
कोल्हार ( डिजिटल मिडिया वृत्तसेवा)
:- अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कोल्हार भगवतीपूर येथील प्रवरा नदीपात्रात चालु असलेल्या वाळु उत्खनन, वाहतुक या ठिकाणी येऊन मशीनवरील आँपरेटर तसेच कामगार यांना दमदाटी करुन तुमचे मशीन नदीच्या बाहेर काढा. नाही काढल्यास पेटवुन देवु अशी धमकी दिल्याची घटना घडली.
बाळु फकीरा कोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुणाल दशरथ गायकवाड सह एकूण आठ जण सर्व रा.भगवतीपुर ( कोल्हार ) यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
लोणी पोलिसात दाखल गुन्ह्यात म्हटले आहे की, वरील आठ जणांनी हा अवैध वाळू उपसा असल्याच्या कारणावरून विरोध केला. तसेच शासकीय कामकाजात अडथळा आणला. स्थानिक वृत्त वाहीनी मार्फत व्हीडीओ प्रसारीत करून खोटे बदनामीकारक वृत्त प्रसारीत केले.
याबाबत गु. र. नं. 567/2023 भादवि कलम 387,143,144,147,148,177,186,109,114,184,188,189,285,447,500,501,506 प्रमाणे लोणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि युवराज आठरे यांचे मार्गदनाखाली पो.स.ई. चव्हाण करीत आहेत.