लोकसेवा आयोगाच्या परीक्षामध्ये प्रवरेच्या केंद्रातील विद्यार्थी यशस्वी!
लोणी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र शासनामार्फत घेतल्या गेलेल्या सरळ सेवा परिक्षेत प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्रातील चार विद्यार्थ्यानी यश संपादन करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक सुसज्ज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असावे आणि त्यामध्ये शहराप्रमाणेच सर्व सोयी सुविधा असव्यात या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामीण मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना लोणी, पाथरे , आश्वी, कोल्हार , राहता आणि शिर्डी या ठिकाणी केली.तज्ञ मार्गदर्शक आणि स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज अभ्यासिकांची स्थापना केली.
ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी शहरी भागात जावे लागू नये हाच विचार मार्गदर्शन केंद्र सुरु करताना ठेवला.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या काही परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला.यामध्ये लोणी येथील प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्राचा विद्यार्थी कुणाल एलमामे याची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात असिस्टंट कामांडट म्हणून अनिल कोते यांची कार्पोरेट मंत्रालयाच्या एस.एफ.एल.ओ मध्ये असिस्टंट संचालक म्हणून निवड झाली आहे.तसेच महाराष्ट्र शासनामार्फत घेतल्या गेलेल्या सरळ सेवा परीक्षेत मेजर नितीन गायकवाड कनिष्ठ लिपिक (कारागृह ),बाळासाहेब वडतिके (नगरपरिषद लेखा व लेखा परीक्षण सेवा) यांची निवड झाली आहे.
विद्यार्थ्यानी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील ,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील ,माजी खा.डाॅ.सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुश्मिता विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ , सहसचिव भारत गोगरे, शिक्षण संचालक डॉ प्रदीप दिघे शिक्षण संचालिका लीलावती सरोदे ट्रेनिंग प्लेसमेंट सेलचे प्रमुख मनोज परजणे, आश्वी कॉलेजचे कॅम्पस डायरेक्टर महेश खर्डे पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय याचे कॅम्पस डायरेक्टर डॉ आर.ए. पवार कोल्हार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हरिभाऊ आहेर स्पर्धा परीक्षा सेलचे समन्वयक डॉ शैलेश कवडे-देशमुख यांनी अभिनंदन केले.