दोन हजार तरूणांना मिळणार रोजगार : मंत्री विखे पाटील.
शिर्डी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
राजेंद्र दूनबळे
शिर्डी एमआयडीसीत संरक्षण सामग्री निर्मिती करणाऱ्या कारखान्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या कारखान्याच्या माध्यमातून शिर्डी व राहाता परिसरातील २ हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
महसूल पंधरवडानिमित्त राहाता तालुक्यात शासकीय योजनांच्या वैयक्तिक लाभाचे नुकतेच मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी शिर्डी प्रांताधिकारी माणिकराव आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने आदी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, ‘राहाता तालुक्यातील या मेळाव्यात सामाजिक अर्थसहाय्याच्या योजनेत ८१३ लाभार्थ्यांना व कृषी विभागाच्या १२०० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत ७६ कोटी ३३ लाखांचा आरोग्य लाभ वितरित करण्यात आला. १७ हजार २६३ शेतकऱ्यांच्या खात्यात ९ कोटी ४४ लाखांचे दूध अनुदान देण्यात आले. ४४ हजार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला.” असल्याचे या वेळी सांगितले.