विहिरीत मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला आहे.परिसरात नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण.
टाकळीभान( प्रतिनिधी )
टाकळीभान टेल टॅंक परिसरातील द्वारकाबाई नामदेव वाघुले यांच्या शेतातील विहिरीत मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला आहे,
या बाबत सविस्तर वृत्त असे की टेल टॅंक शेजारी द्वारकाबाई नामदेव वाघुले गट नंबर 106 या शेतातील जुनाट विहिर आहे ,त्या शेतात बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता बबलू राधाकिसन वाघुले,चक्कर मारण्यासाठी गेला असता , दुर्गंधीचा वास आला, त्यांनी विहिरीकडे जाऊन डोकावून पाहिले असता पाण्यावर बिबट्या मूर्त अवस्थेत फुगून वर आलेला दिसून आला, बबलू वाघुले यांनी ताबडतोब फॉरेस्ट कर्मचारी आयुष्यमान बढे यांच्याशी संपर्क साधून माहिती कळवली, पण अंधार पडल्याने असल्यामुळे विहिरीवर झाडे झुडपं जास्त व जुनाट विहीर असल्याने, बिबट्यास वर काढणे शक्य होणार नाही,
म्हणून गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठिक 11 वाजता फॉरेस्ट अधिकारी विलास डगळे, आयुष्यमान बढे व त्यांचे सहकारी व शेतकरी बबलू वाघुले घटनास्थळी येऊन विहिरीमध्ये बाज सोडून बिबट्यास वर काढून रीतसर पंचनामा व पोस्टमार्टम करून मृत बिबट्याची विल्हेवाट लावली