खिर्डीतील सरकारी जमिनीवर अनधिकृत अतिक्रमण ,अनोळखी मृतदेह दफन केल्याचे आरोप चितळकरचे तहसीलदार निवेदन
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)
श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथील महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेल्या गायराण सरकारी जमिनीवर अनधिकृत बांधकाम तसेच अनोळखी मृतदेह दफन केल्याचा आरोप भाजपा तालुका सरचिटणीस अनिल चितळकर यांनी केला असून याप्रकरणी तात्काळ चौकशी करून अतिक्रमण काढून घ्यावे असे निवेदन त्यांनी तहसीलदारांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, खिर्डी गावात महाराष्ट्र शासनाच्या असलेल्या गायराण सरकारी जमिनीवर पाच ते सहा एकरामध्ये बेकायदेशिररित्या बांधकाम करून अतिक्रमण केलेले आहे. तसेच त्या ठिकाणी गेल्या काही काळापासून ‘अनोळखी मृतदेह दफन केलेले आहे. ते मृतदेह कोणी गुन्हेगार किंवा कोणी अतिरेकीतर नाही ना ? याची सखोल चौकशी करून अतिक्रमण करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावे . याविषयी ग्रामसेवकांना माहिती दिली तरी ग्रामसेवक कुठलीही दखल न घेता विषय टाळत असून या सरकारी जमिनीवरील अतिक्रमण तसेच दफन केलेल्या मृतदेहांमुळे परिसरामध्ये भितीचे वातावरण असून या परिसरात जातीय तेढ निर्माण होऊ नये ? म्हणून प्रशासनाने तत्काळ कारवाई करून या विषयाची चौकशी करावी तसेच अतिक्रमण काढून घ्यावेत असे चितळकर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.