Breaking
ब्रेकिंग

शिर्डीत गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी लाखो साईभक्तांनी घेतले श्री साईबाबांचे दर्शन साई समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा व लेंडी बागेतील शताब्दी ध्वजाचे करण्यात आले पूजन !

0 9 1 3 8 2

 

 

शिर्डी (राजकुमार गडकरी)

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी रविवारी राज्यातून व देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर शिर्डी माझे पंढरपुर म्हणत गोव्‍यासह राज्‍याच्‍या विविध भागातून आलेल्‍या पालखीतील साईभक्‍तांच्‍या साईनामाच्‍या गजराने शिर्डी दुमदुमून गेली.

आज रविवारी उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाली.काकड आरतीनंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. अखंड पारायण समाप्ती मिरवणूकीत संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा तर संरक्षण अधिकारी रोहिदास माळी व इंग्लिश मिडीअम स्‍कुलचे प्रचार्य आसीफ तांबोळी यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदिर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात, प्र.जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान झाले. सकाळी ०७.०० वाजता श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या निमित्‍त अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्‍यांची सुविद्य पत्नी सौ.मालती यार्लगड्डा यांनी श्रींची पाद्यपूजा केली. सकाळी ८.०० वाजता लेंडीबागेतील शताब्‍दी ध्‍वजाचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व सौ. मालती यार्लगड्डा तसेच मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व सौ. वंदना गाडीलकर यांच्‍या हस्‍ते पुजन करण्‍यात आले. गोव्‍यासह राज्‍यातील विविध ठिकाणाहुन आलेल्‍या पालखीतील साईभक्‍तांच्‍या साईनामाच्‍या गजराने शिर्डी दुमदुमून गेली.

सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० या वेळेत श्री नाना वीर, शिर्डी यांचा साईभजन कार्यक्रम झाला. दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. दुपारी ०१.०० ते दुपारी ०३.०० या वेळेत संजीव कुमार, पुणे यांचा भजनसंध्‍या कार्यक्रम, सायंकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत ह.भ.प.श्री संतोष पित्रे, डोंबिवली यांचा कीर्तन कार्यक्रम, सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती , सायंकाळी ७.३० ते रात्रौ १०.०० यावेळेत श्री नीरज शर्मा, दिल्‍ली यांचा भजन संध्‍याचा कार्यक्रम, रात्रौ ०९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे. आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून या दिवशी श्रींची शेजारती व दिनांक २२ जुलै रोजीची पहाटेचे श्रींची काकड आरती होणार नाही. आज रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन (हजेरी) कार्यक्रम मंदिराशेजारील स्टेजवर होणार आहे.

तर उत्सवाच्या सांगता दिनी सोमवार दिनांक २२ जुलै रोजी पहाटे ०५.०५ वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०६.५० वाजता श्रींची पाद्यपुजा, सकाळी ०७.०० वाजता गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून सकाळी १०.०० ते १२.०० वाजता या वेळेत ह.भ.प.श्री वैभव ओक, डोंबिवली यांचा गोपालकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० चे दरम्‍यान श्रींची माध्यान्ह आरती होणार असून दुपारी ०१.०० ते ०३.०० या वेळेत श्रीमती वनिता बजाज, दिल्‍ली यांचा साईभजन कार्यक्रम होणार आहे. दुपारी ०४.०० ते ०६.०० या वेळेत श्री विरेंद्रकुमार, साई ब्रदर्स, प्रयागराज यांचा मनोहारी भक्‍तीमय भजनांचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत श्री. ग्‍यानेश वर्मा, मुंबई यांचा साईराम गुणगान कार्यक्रम होईल. रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होईल.

दरम्यान आज गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी लाखो साई भक्तांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. साई संस्थांनच्या महाप्रसादालयातही साई भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शिर्डी गुरु पौर्णिमा उत्सवा निमित्त साई नामाने दुमदुमून गेली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे