शिर्डी येथील साई संस्थांनच्या श्री साईबाबा हॉस्पिटलने कार्डीयाक सर्जरीमध्ये केला २० हजार रुग्णांचा टप्पा पार !! या विभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा करण्यात आला सत्कार!!
शिर्डी ( प्रतिनिधी) राजकुमार गडकरी
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या श्री साईबाबा हॉस्पिटलमधील कार्डीयाक विभागाने हॉस्पिटल स्थापनेच्या सन २००६ पासुन आजपर्यंत २० हजार रुग्णांच्या शस्त्रक्रियेचा टप्पा पार केला आहे. यानिमित्ताने श्री साईबाबा हॉस्पिटलध्ये बुधवार दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी एका विशेष समारंभाचे आयोजन करणेत आले होते.
या समारंभात श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी , गोरक्ष गाडीलकर ,भा.प्र.से कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन उपस्थीत होते. यावेळी बोलताना त्यांनी कार्डीयाक सर्जरी विभागामध्ये आतापर्यंत योगदान दिलेल्या सर्व डॉक्टर कर्मचारी नर्स यांचे अभिनंदन करुन तुमच्या अथक योगदानातुनच श्री साईबाबा हॉस्पिटलने हा यशस्वी टप्पा पार केला असुन अशाच प्रयत्नातुन तुमच्या हातुन अनेक रुग्णांचे आयुष्य वाढवायचे काम व्हावे . यातुन श्री साईबाबांनी दिलेला रुग्ण सेवा हिच ईश्वरसेवा या शिकवणीनुसार तुम्ही कार्यरत राहुन अशाच प्रकारे रुग्ण सेवेचा वसा यापुढे चालु रहावा यासाठी हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर व कर्मचा-यांनी प्रयत्न करावे .असे आवाहन करुन कार्डीयाक सर्जरी विभागाच्या कामाचे कौतुक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कार्डीयाक सर्जरी ऑपरेशन थिएटरमधील डॉक्टरांचे व संबधीत नर्सिंग कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देवुन सन्मान करणेत आला. डॉ. महेश मिस्तरी, डॉ.विद्युतकुमार सिन्हा, डॉ.विजय नरोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन कार्डीयाक सर्जरी विभागाच्या या यशाचा आलेख यावेळी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसमोर मांडला.
या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तुकाराम हुलवळे, वैद्यकीय संचालक, लेफ्ट कर्नल, डॉ.शैलेश ओक, उपवैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे, कार्डीयाक सर्जन, डॉ.महेश मिस्तरी, डॉ.विद्युतकुमार सिन्हा, कार्डीओलॉजीस्ट डॉ.संदिप देवरे, न्युरो सर्जन, डॉ.मुकुंद चौधरी, फिजीशिअन डॉ.अजिंक्य ढाकणे, अतिदक्षता तज्ञ डॉ.विजय नरोडे, भुलतज्ञ, डॉ.संतोष मराठे, डॉ.संतोष सुरवसे, डॉ.निहार जोशी, डॉ.गायत्रीलक्ष्मी नागपुरे, सहा.अधिसेविका मंदा थोरात यांच्यासह रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स कर्मचारी, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक सुरेश टोलमारे जनसंपर्क अधिकारी रुग्णालये यांनी केले, सुत्रसंचालन शकरानंद ओहोळ यांनी केले तर मान्यवरांचे आभार उपवैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे यांनी मानले.