प्रसिद्ध सिने अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी सौ धनश्रीताई विखे यांच्या समवेत शिर्डीत घेतले साईबाबांचे दर्शन! त्यांच्या उपस्थितीत नारीशक्ती सन्मान सोहळा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न!
शिर्डी ( प्रतिनिधी)
प्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी आज शुक्रवारी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत सौ धनश्रीताई सुजय विखे पा. ह्या होत्या.साईदर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे यांनी शाल व प्रसाद देऊन सत्कार केला. यावेळीही धनश्रीताई विखे पाटील, श्री साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.
सिने अभिनेत्री श्रद्धा कपूर या शिर्डीत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्री महोत्सवा निमित्त साईप्रसादालयामागे होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या जागर आदी मायेचा सन्मान श्री शक्तीचा या प्रसिद्ध अशा कार्यक्रमासाठी आल्या होत्या. कार्यक्रमा अगोदर त्यांनी मंदिरात जाऊन साई बाबांचे दर्शन घेतले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमात माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भेट देऊन या कार्यक्रमाला शुभेच्छा देत असे प्रसिद्ध व मोठे कार्यक्रम पुणे मुंबईत होत असतात. मात्र ग्रामीण भागातील लाडक्या बहिणीसाठी असे सांस्कृतिक व करमणुकीचे कार्यक्रम शिर्डीत ठेवतो. तसेच येथे त्या निमित्ताने मोठमोठे कलाकार येतात. आम्ही बोलवण्यापेक्षा श्री साईबाबाच त्यांना बोलवतात व आपणही येथे येऊन आपली कला सादर करतात .असे डॉक्टर सुजय विखे यांनी सांगत यावेळी अभिनेत्री श्रद्धा कपूर व सर्व कलाकारांना, उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर सौ धनश्री ताई विखे व सर्व कलाकार उपस्थित होते. त्याचप्रमाणे या नारीशक्ती सन्मान सोहळा सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला भगिंनी उपस्थित होत्या.