लक्ष्मीवाडी येथील डी पी प्रश्न मार्गी न लागल्यास ठिय्या आंदोलन करणार – मयूर पठारे
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
टाकळीभान प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील-टाकळीभान गावातील बेलपिंपळगाव रस्त्यावरील कोंबडवाडी परिसरात असलेली महावितरणची डीपी गेल्या महिन्यापासून वारंवार जळत आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना, घरघुती वीज ग्राहकांना आणि ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सदर डीपी साठी तातडीने उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे ठिस्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा लोकसेवा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात येत असल्याचे बाजार समितीचे संचालक मयुर पटारे यांनी सांगितले आहे. त्यासंदर्भात भोकर सबस्टेशनचे सहाय्यक अभियंता मुळे आणि वायरमन कैलास घोळवे यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
निवेदनावर कारखान्याचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, बाजार समितीचे संचालक मयुर पटारे, माजी व्हाइस चेअरमन दत्तात्रय नाईक, संत सावताचे संचालक विलास दाभाडे, कारखान्याचे संचालक यशवंत रणनवरे, ग्रामपंचायत सदस्य सुनील बोडखे, प्रकाश दाभाडे, गोटिराम दाभाडे, भारत भवार शिवाजी पवार, गोरख दाभाडे, शिवाजी पटारे, अशोक रोटे आदींच्या सह्या आहेत.