भारतीय जनता पक्षाचे उत्तर नगर जिल्हा अधिवेशन राहाता येथे नुकतेच उत्साहात संपन्न! सरकारने आणलेल्या विविध योजना घराघरात प्रभावीपणे पोहोचवण्याचे काम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी करावे –भाजपाच्या राष्ट्रीय सचिव श्रीमती विजयाताई राहटकर,
शिर्डी (प्रतिनिधी) केंद्र व राज्य सरकारने अंमलात आणलेल्या विविध योजना घराघरात प्रभावीपणे पोहोचवण्याचे काम भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी करावे. असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव श्रीमती विजयाताई रहाटकर यांनी केले.
राहता येथील कुंदन लॉन्स येथे भारतीय जनता पार्टी उत्तर नगर जिल्ह्याचे अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. यावेळी त्या उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. यावेळी भारतीय जनता पार्टीचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा महिला अध्यक्ष कांचन मांढरे,, नितीन दिनकर, प्रवराचे अध्यक्ष कैलास तांबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, प्रकाश चित्ते,बाळासाहेब गाडेकर , योगेश गोंदकर सचिन शिंदे आदीसह भाजपाचे उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी विजयताई राहटकर म्हणाल्या की, लोकशाहीत निवडून येण्यासाठी काम करावे लागते, दुसऱ्यांदा निवडून येण्यासाठी तर आणखी प्रभावी काम करावे लागते. देशाचे पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्र मोदी तर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यांनी विविध योजना देशात प्रभावीपणे राबवल्या. नरेंद्र मोदी यांना देशवासियांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसविण्यासाठी समर्थन दिले ही किमया फक्त प्रधानमंत्री यांनी सुरू केलेल्या योजनांची होती. ते प्रधानमंत्री नाहीतर प्रधान सेवक म्हणून त्यांनी काम केले व करत आहेत. मात्र राज्यात विरोधकांनी खोटा प्रचार केला. जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचे काम केले.मात्र या खोट्या प्रचाराच्या विरोधात यावेळी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लढून आपले सरकार अच्छे सरकार हा संदेश घरोघरी पोहोचवा. केंद्राच्या राज्याच्या योजना प्रभावीपणे घराघरात पोहोचवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. काँग्रेस सरकारच्या काळात फक्त घोषणा होत्या, मोदींच्या कार्यकाळात योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांनी प्रधान सेवक म्हणून सेवा केल्याचे, व करत असल्याचे विजया राहाटकर यांनी यावेळी सांगितले. राज्यातील महायुती सरकारने ही मागील अडीच वर्षात सर्वाधिक लोकहिताचे निर्णय घेतले . महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण, मुलींना मोफत शिक्षण आणि शेतकऱ्यांसाठी सौर पंप आदी योजना सुरू केली आहे. या योजनांसाठी बुथ स्तरापर्यंत कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे. असेही यावेळी ते म्हणाल्या.
भारत देश हा विविध राज्य व विविध भाषा वेशभूषा संस्कृती खानपान असलेला देश असला तरी आपण सर्व तिरंगा खाली एक आहोत. म्हणूनच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यानुसार आपण 15 ऑगस्ट रोजी घराघरावर हर घर तिरंगा फडकवित असतो. त्यातून देशभक्ती व एकीचा संदेश संपूर्ण जगात जात असतो .हा देश नेतृत्वाचा विचार आहे.असेही त्यांनी यावेळी सांगत प्रत्येक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान केले त्याबद्दल सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत त्यांनी यावेळी पक्षाच्या वतीने सर्वांचे आभार मानले. या उत्तर नगर जिल्हा भारतीय जनता पार्टी पक्षाच्या अधिवेशनाला उत्तर नगर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विठ्ठलराव लंघे, नितीन कापसे आदींचेही भाषणे झाली.