महिलांवरील अन्याय आणि घरगुती हिंसा आणि अत्याचार होऊ नये यासाठी प्रवरा रेडिओ द्वारे हिंसा को नो या विषयांवर जनजागृती.
लोणी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
महीलांवरील अन्याय आणि घरगूतीहिंसा आणि महिलांवर अत्याचार होऊ नये यासाठी केव्हीके प्रवरा कम्युनिटी रेडीओद्वारे”सुनो सोचो समझो चुपी तोडो और कहो हिंसा को नो ” या प्रकल्पाअंतर्गत जनजागृती कार्यक्रम सुरु असून या माध्यमातून महीलांना निर्भर व्हा असा संदेश दिला जात असून स्मार्ट, नवी दिल्ली अंतर्गत तीन वर्षाचा हा प्रकल्प अनेक महीलांसाठी महत्वपूर्ण ठरत आहे अशी माहीती बाभळेश्वरच्या कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील,कार्यकारी अधिकारी सौ.सुप्रियाताई ढोकणे पाटील आणि सचिव डाॅ.निलेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील १३ वर्षापासून केव्हीके प्रवरा कम्युनिटी रेडीओच्या माध्यमातून कृषि, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास आणि लोकसंस्कृतीवर हा रेडीओ काम करतो. कोविड काळात रेडीओच्या माध्यमातून जनजागृती बरोबरचं शेतक-यांना थेट ग्राहकांना मार्केटींगसाठी प्रोत्साहन दिले आहे. महीलांसाठी निरोगी नारी कुंटुंब तारी, मतदान जागृती, सेंद्रीय शेती, पर्यावरण संवर्धन, यासारख्या प्रकल्पाद्वारे श्रोत्यांची जनजागृती केली आहे.
स्मार्ट प्रकल्पातून महीलांची होणारी हिंसा, अत्याचार आणि महीलांना येणाऱ्या विविध समस्या यांवर जनजागृती करत असल्याचे रेडीओचे प्रमुख कैलास लोंढे यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या समन्वयक गायत्री म्हस्के यांच्या माध्यमातून आशाताई, अंगणवाडी सेविका, याचे गट स्थापन करून जनजागृती होत असून या लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, लोहगांव, बाभळेश्वर आणि तिसगाव या गावाचा समावेश आहे. या उपक्रमातून घरगुती हिसा होऊ नये यासाठी महीलांनी विविध उपक्रम सुरु असून महिलांचा सहभाग यामध्ये वाढत आहे.
कोट…
कृषि क्षेञाबरोबरचं महिलांसाठी रेडीओचे कार्यक्रम हे महिलांसाठी महत्वपुर्ण ठरत आहे. आरंभ, सुरवातीचे क्षण मोलाचे आणि आमची उर्मिला याशिवाय दररोज प्रसारित होणारा गप्पा तुमच्या आमच्या कार्यक्रमातून वेगवेगळ्या विषयांवर जनजागृती करत आहे.सबका साथ सबका विकास याव्दारे रेडीओने आपले वेगळेपण कायमचं जपले आहे. सौ गायत्री म्हस्के संचालक