मराठा समाज व इतर समाज घटक व सर्व ग्रामस्थाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
टाकळीभान( सत्तेचा महासंग्राम वृत्तसेवा)
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाज व इतर समाज घटक व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने श्रामपूर -नेवासा राज्यमार्ग 44 या रस्त्यावर बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2030 रोजी सकाळी ठीक 10 वाजता बस स्टॅन्ड समोर शांततेच्या मार्गाने सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले रास्ता रोको आंदोलनात प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता
मराठा समाजाला आरक्षण आरक्षण मिळावे यासाठी माजी सरपंच मंजा बापू थोरात म्हणाले की, मनोज जारंगे पाटील हे कोणत्याही पक्षाचे अथवा राजकारणी नसून ते एक सर्वसामान्य कुटुंबातील असून मराठा समाज घटकाला आरक्षण मिळावे म्हणून जीवाची परवा न करता धडपड करीत आहे आजही 80 टक्के मराठा समाज गरीब असून त्यांच्या घराचे पाचरट अजून बदलले नाही आम्हाला कोणावरही अन्याय करायचा नाही म्हणून समाज बांधवांनी पक्ष नेता बाजूला ठेवून शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले.
तसेच उपसरपंच कान्होबा खंडागळे म्हणाले की, पूर्वी मराठा समाज हा शेती करत होता म्हणून त्याची ओळख कुणबी असल्यामुळे मराठा समाजालाओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे, आरक्षणाची टक्केवारी न वाढता व मराठा प्रवर्ग वेगळा करू नका अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे. पूर्वी मराठा समाजाला शेती मोठ्या प्रमाणात होती पण कुटुंबांची संख्या वाढल्यामुळे मराठा समाजाची परिस्थिती अतिशय हालकीची झाली असून त्यामुळे मुलांना शिक्षणात ज्यादा मार्क पडूनही आरक्षण नसल्यामुळे पुढील शिक्षण घेता येत नाही ही एक मोठी शोकांतिका आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर पुढील काळात मतदानावर बहिष्कार टाकू व कोणत्याही जाती धर्माला व पोलीस पोलीस प्रशासनाला त्रास देण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. असेही कान्होबा यांनी सांगितले
तर राजाभाऊ कोकणे म्हणाले की, मनोज जरांगे हा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता लढताना दिसत आहे सरकारने त्वरित जागे होऊन त्याच्या जीवाची हनी न होता आरक्षण द्यावे जरंगे पाटलांनी आरक्षणासाठी 40 दिवसाची मुदत देऊनही राज्य सरकारला जाग आली नाही थोडा तरी हृदयाला पाझर फुटू द्या व कोणत्याही समाज घटकाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण द्या जर जरांगे पाटलांच्या जीवाचे हानी झाल्यास सरकारला पळती भुई थोडी होईल अशी खंतही कोकणे यांनी बोलून दाखवली
यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार, सोसायटीचे माजी चेअरमन राहुल पटारे जयकर मगर भाजपाचे नारायण काळे, आदींनी मनोगत व्यक्त केले रस्ता रोको आंदोलनाचे निवेदन टाकळीभान मंडळाधिकारी प्रशांत ओहोळ यांनी स्वीकारले व श्रीरामपूर तालुक्याचे पीआय दशरथ चौधरी यांनी चौक बंदोबस्त ठेवला रस्ता रोको साठी सकल मराठा समाज व इतर समाज घटकातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते