श्रीक्षेत्र सावळीविहीर बुद्रुक येथे दि. 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट 2024 या कालावधीत श्री साई सच्चरित्र पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा! दररोज कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन!
शिर्डी (प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र सावळीविहीर बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट ते मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 या कालावधीत श्री साईसतचरित्र पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राहता तालुक्यातील श्रीक्षेत्र सावळीविहीर बुद्रुक येथील श्री हनुमान मंदिराच्या सभा मंडपात मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री साई व श्री विठ्ठल रुक्मिणी माता प्रतिमा पूजन तसेच विना, टाळ, मृदूगं व ग्रंथाचे पूजन करून श्री साई सच्चरित्र पारायणास व या हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार आहे. या सोहळ्यानिमित्त दररोज सकाळी सात ते अकरा या कालावधीत श्री साईसत् चरित्र पारायण अध्याय वाचन, व्यासपीठ चालक ह भ प सचिन भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. तसेच दुपारी हरी जागर, भजन, सायंकाळी पाच ते सहा या वेळेत हरिपाठ व सायंकाळी सात ते नऊ या वेळेत जाहीर हरी किर्तन होणार आहे व किर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम रात्री नऊ ते दहा या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. या श्री साईसत चरित्र पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी मुक्ताई ज्ञानपीठ पुणतांबाचे ह भ प उत्तम महाराज गाढे यांचे कीर्तन होणार आहे. तर बुधवार 21 ऑगस्ट रोजी चिंचखेडा ,कन्नड येथील ह भ प सुरेश महाराज आढाव यांचे तर गुरुवार 22 ऑगस्ट रोजी नांदुरखी येथील ह भ प अर्जुन महाराज चौधरी तसेच शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी पैठण येथील ह भ प माधव महाराज पैठणकर त्याचप्रमाणे शनिवार 24 ऑगस्ट रोजी सोनेवाडी येथील ह भ प कविताताई साबळे तर रविवार 25 ऑगस्ट रोजी विंचूर येथील ह भ प निलेश महाराज निकम यांचे सात ते नऊ या वेळेत कीर्तन होणार आहे. तर सोमवार 26 ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी असल्यामुळे रात्री दहा ते बारा या कालावधीत शिंगवे येथील ह भ प प्रतिभाताई जाधव यांचे कीर्तन होणार असून मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी आठ ते साडेआठ या कालावधीत श्री साई प्रतिमा व श्री साई सत चरित्र ग्रंथाची मिरवणूक गावातून निघणार असून त्यानंतर सकाळी नऊ ते 11 या वेळेत अकोले येथील ह भ प रमेश महाराज भोर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यासाठी मृदंगाचार्य ह भ प संदीप महाराज वैद्य तसेच गायनाचार्य म्हणून हभप रावसाहेब महाराज वेताळ व किरण महाराज हारळे, हे राहणार असून या सोहळ्यानिमित्त होणाऱ्या श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने साई भक्तांनी, भाविकांनी सामील व्हावे .त्याचप्रमाणे दररोज होणाऱ्या कीर्तन व सर्व कार्यक्रमांचा मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन सावळीविहीर बुद्रुक समस्त ग्रामस्थ यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.