बालविवाह रोखण्यासाठी ग्रामसेवकावर जबाबदारी देण्यात यावी ..ज्ञानेश्वर अहिरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)
ज्या गावात बालविवाह त्या गावातील ग्रामसेवकावर बाल विवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. याबाबत निवेदन एकलव्य भिल्ल सेना राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी प्रांता आधिकारी साहेब शिर्डी यांना देण्यात आले आहे
या निवेदनात म्हटले आहे की वरील विषयी आपणास एकलव्य भिल्ल सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने गांभीर्याने कळविण्यात येते की सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बालविवाहाचे प्रमाण अतिशय वाढले आहे. त्याचा अतिशय घातक परिणाम समोर यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अल्पवयीन माता मृत्यूचे प्रमाण तसेच कुपोषित बालकांचे मृत्यू प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच अल्पवयीन वयात जन्मलेले बाळ अतिशय कुपोषित व दुबळे जन्माला येत असल्याने त्या बालकाचा व देशाच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होण्यास मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहे. बाल विवाह रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावी त्यासाठी प्रथम ज्या गावात विवाह होणार आहे अशा गावातील ग्रामसेवकांस संबंधित वधूवरना शाळा किंवा जन्माचा दाखला तपासून वय पूर्ण झाले आहे की नाही याची माहिती शासनाला कळविण्याची अनिवार्य करावे. तसेच वधूवर पैकी कोणालाही अल्पवयीन असला तरी सदर विवाह रोखण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनची त्वरित संपर्क साधावा असा आदेश ग्रामसेवकास शासनाने द्यावा असे असतानाही संबंधित ग्रामसेवकाने हलगर्जीपणा केल्यास व त्या गावातील बालविवाह झाला असल्यास सिद्ध झाल्या त्या संबंधित वधू-वारांचे लग्न लावणाऱ्या पालकास व त्या गावातील ग्रामसेवकास बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा त्या ग्रामसेवकास त्वरित बडतर्फ करण्यात यावे संबंधित विषयाचा गांभीर्याने पाठपुरावा करून कारवाई करण्याच्या सूचना द्याव्या
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री साहेब मंत्रालय मुंबई महिला व बालविकास मंत्री मंत्रालय मुंबई जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर .पोलीस अधीक्षक साहेब अहिल्यानगर यांना देण्यात आल्या आहेत. सदर निवेदनाची योग्य ती दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी ज्ञानेश्वरी अहिरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.