देवांची मंदिरे लहान असली तरी चालेल पण या मंदिरांमध्ये येणारी पिढी ज्ञानवंत निर्माण करणारी शाळा महाविद्यालयांसारखी ज्ञानमंदिरे अद्यावत असणे खूप गरजेचे —ह भ प निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर,)
शिर्डी( राजकुमार गडकरी)
शाळा ही ज्ञानमंदिर आहेत, ती सुधारली पाहिजेत, सुसज्ज झाली पाहिजेत. देवांचीमंदिरे लहान असली तरी चालेल पण या मंदिरामध्ये येणारे पिढी ज्ञानवंत निर्माण करणारी शाळा महाविद्यालयांसारखी ज्ञानमंदिरे ही अद्यावत असणे गरजेचे आहे. व त्यासाठी अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. असे मत प्रसिद्ध समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी व्यक्त केले.
राहता तालुक्यातील श्रीक्षेत्र रुई येथे 131वा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तन मालिकेतील चौथे पुष्प गुंफतांना ते रुई येथे आपल्या कीर्तनातून अध्यात्मिक ज्ञानाबरोबरच सामाजिक जाणिवेचे महत्व पटवून देताना बोलत होते.
ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी श्रीक्षेत्र रुई येथे हरिनाम सप्ताह निमित्त आयोजित कीर्तनात विविध दाखले देत काकडा, हरिपाठ महत्त्वाचा आहे. मात्र अनेक ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. मंदिरांमध्ये काकडा हरिपाठ हा झालाच पाहिजे, तुकाराम गाथा ही संत तुकारामांच्या तोंडून आलेला परमेश्वराचा प्रसाद आहे तर निवृत्तीनाथांचा संत ज्ञानदेवांकडून दिलेला ज्ञानेश्वरी हा प्रसाद आहे. असे सांगत ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा किती महत्त्वाचे आहे. हे अनेक उदाहरण देऊन पटवून दिले. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान व ज्ञानापेक्षा देवाचे ध्यान श्रेष्ठ आहे. त्यामुळे ध्यान महत्त्वाचे आहे. पण त्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे. सरावा शिवाय गायन नाही, पुस्तक उघडल्याशिवाय ज्ञान, किर्तन नाही .लिनते शिवाय व्यापार नाही, नम्रते शिवाय लक्ष्मी नाही, कष्टाशिवाय दोन वेळची भाकरी नाही, असे सांगत देवाचे ध्यान सुद्धा आत्मिक चिंतन मनन केल्याशिवाय होत नाही. काकडा हा भूपाळी प्रकारातलाच अभंग आहे .तो मंदिरांमध्ये सकाळी झाला पाहिजे. पण सध्या तसे होताना दिसत नाही. मात्र सध्या भजन कुठेही होते. तसे करू नये. भजन हे देवळातच व्हावे. असे सांगत आतापर्यंत अनेकांनी इतरांचे भोंगे बांधले, दुसरेच काम केले, पण माऊलींचे पसायदान पाठ केलं नाही. दुसऱ्याचे भोंगे बांधून कामे होणार नाही. मात्र पसायदान पाठ केलं तर ते नक्कीच जीवनात, आयुष्यात काम येईल .असं सांगत काकडा हा भूपाळी प्रकारातला एक अभंग आहे .भूपाळीचा भू म्हणजे जमीन, पृथ्वी व पाली म्हणजे पालन पोषण करणारा, त्याचे भजन करणे म्हणजेच भूपाळी असे सांगत भूपाळी चा दुसरा अर्थ असा की भू म्हणजे राजा व आली म्हणजे प्रजा, प्रजेने राजासाठी केलेली अर्चना म्हणजे भूपाळी होय. तसेच भूपाळी मध्ये गायनाचे सहा रागाचे प्रकार आहेत. ते गायले तर देव प्रसन्न होतो. म्हणूनच भूपाळी किती महत्त्वाची आहे. ती म्हटली पाहिजे. असे ते म्हणाले. प्रत्येकाच्या आयुष्यात काम, वासना आहे. कामाला वय नाही, लाज नाही, नातं नाही, साथ नाही कुळ नाही, शील नाही, त्याचप्रमाणे वासना ही सुद्धा आयुष्यात मोठी घातक आहे. आजच्या युगात अल्पवयीन मुली पळून जातात, अनेकांचे वयस्कर आई वडील वृद्धाश्रमात दिसतात. बापा अगोदर मुलगा जातो, असं सध्या सर्व काही चित्र बदलत चालले आहे. त्याला एकमेव कारण वासना आहे. वासना आजकाल सर्वांची फिरली आहे. सत्याचा भोक्सा काढला अन पूर्ण ओटा भरला म्हणजे सत्य झाकायचे ,लोकांना आम्ही खूप पंडित आहोत. अस दाखवायचे पण प्रत्यक्षात तसं काही नसतं. फक्त खोटा भुसा भरलेला असतो. सत्य काढलेल असतं. त्यामुळे जीवनामध्ये काम वासनेला थारा नको, पण त्यासाठी आध्यात्मिक ज्ञानाकडे वळले पाहिजे .प्रवचन कीर्तन पारायण याचबरोबर काकडा हरिपाठ नित्यनेमाने झाला पाहिजे. असेही त्यांनी यावेळी आपल्या कीर्तनातून अनेक दाखले देत ,टोमणे मारत, विनोदी शैलीत, प्रबोधन करताना सांगितले. रुई येथील सप्ताह कमिटी , ग्रामस्थ यांनी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा या कार्यक्रमात सन्मान केला. किर्तनाला मोठ्या संख्येने टाळकरी, भजनी मंडळी, वारकरी ग्रामस्थ,भाविक , महिला,उपस्थित होते.