टाकळीभान येथे वयोश्री योजनेअंतर्गत वृद्धांचे फॉर्म भरण्याची काम सुरू..
टाकळीभान (प्रतिनिधी )
टाकळीभान ग्रामपंचायत कार्यालयात मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत वृद्धांचे फॉर्म भरण्याचे दोन दिवस शिबिर सुरुवात करण्यात आली आहे, याप्रसंगी सर्कल अधिकारी प्रशांत ओहोळ, ग्राम विस्तार अधिकारी आर ,एफ, जाधव अंगणवाडी सुपरवायझर खेडकर मॅडम, पुजा डमाळे मॅडम, अंगणवाडी सेविका,अशोक बनकर संदीप जाधव, कोतवाल सदाशिवराव रणनवरे उपस्थित होते,
तर भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या संपर्क कार्यालयामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी अशोक तुपे यांच्याकडे 50 अर्ज सादर करण्यात आले , यावेळी रमेश धुमाळ, सेवा संस्थेचे चेअरमन एकनाथ पटारे,व दीपक डुकरे, भाजप चे श्रीकृष्ण वेताळ, अविनाश लोखंडे , चित्रसेन रणनवरे आदी उपस्थित होते यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार यांनी नागरिकांना आवाहन केले की जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे वय 65 किंवा पुढे असेल त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा प्रत्येकांना तीन हजार रुपयांचे मानधन महायुती सरकार प्रत्येक च्या खात्यावर जमा करणार आहे, त्यासाठी दोन दिवस टाकळीभान ग्रामपंचायत मध्ये विशेष शिबीर चे आयोजन करण्यात आले आहे,