राहाता:-(सत्तेचा महासंग्राम न्युज)
राहाता तालुक्यातील केलवड पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक चे वैद्यकीय अधिकारी वैयक्तिक रजेवर आहे, येथील दवाखाना ओस पडला असून या ठिकाणी मकाचे बियाणे साठवून ठेवले होते . याठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी लवकर पाठवा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहेत .
राहाता तालुक्यातील केलवड खुर्द, केलवड खुर्द, वाकडी, खडकेवाके व कोऱ्हाळे गावासाठी पशुवैद्यकीय अधिकारी आहे, परंतु त्यांच्या अपघातामुळे ते रजेवर आहे या ठिकाणी कारभार पाहण्यासाठी शिर्डीचे पशुवैद्यकीय अधिकारी सुशील कोळपे यांची नियुक्ती केलेली आहेत परंतु त्यांना डॉ-हाळे, शिर्डी कनकुरी, नांदूरखी खुर्द, व नादुरखी बुद्रुक अशा गावांचा व्याप असल्यामुळे केलवड पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी त्यांना वेळ देणे अडचणीचे ठरत आहेत शेतकऱ्यांच्या जनावरांना अचानक डॉक्टरची गरज झाली असेल, आजारी पडलेल्या असेल तर सरकारी डॉक्टरांना बोलावणे शक्य होत नाही . दवाखान्यात जंत औषध, गोचीड बाटली, सलायन, गोळ्या हे मोफत घेता येते परंतु दवाखान्यात डॉक्टर नसल्यामुळे पशुधारकांना याचा लाभ घेता येत नाही, पशुधारकांना सर्व कामे हे खाजगी डॉक्टरांकडूनच करून घ्यावे लागत आहेत त्यामुळे सरकारी डॉक्टर काय उपयोगाचे असे ग्रामस्थ म्हणत आहेत . गावात परिचर हे एक पद रिक्त आहे, तात्काळ केलवड पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
_____
बाईक-
माझ्याकडे पाच गावांचा व्याप आहेत शिर्डीचे काम करत असतानाच तारेवरची कसरत होत आहे, आमच्या दवाखान्यात परिचर पद रिक्त आहेत तरी देखील मी काहीसा वेळ देत आहेत परंतु माझे पाच गावे व केलवड पशुवैद्यकीय दवाखाना पाच गावे एवढे गावे सांभाळणे कठीण होत आहेत.
_____ सुशील कोळपे पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी-१, शिर्डी
____
केलवड पशुवैद्यकीय दवाखान्यात राहाता तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक व श्रेणी दोन चे एकूण 15 दवाखाने आहे या सर्व दवाखान्यातील मकाचे बियाणे केलवड दवाखान्यात साठविण्यात आले होते अजूनही दोन पशुवैद्यकीय दवाखान्यांचे मका बियाणे वाटप होणे बाकी आहे, केलवड सह एकूण दहा गावांचा मका बियाण्याचा माल या ठिकाणी पडून आहेत, इतर १५ दवाखाण्यासाठी बियाणांचा माल येथून पुरवठा झाला, केलवड गावातील 35 शेतकऱ्यांना मकाचे बियाणे वाटप करण्यात येणार आहे.