राहुरी येथील खुनाचा वकील बांधवांकडून निषेध
शिर्डी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
राजेंद्र दूनबले
राहुरी येथील ॲड. राजाराम आढाव व त्यांची पत्नी ॲड मनीषा आढाव या वकीलाचा अमानुषी छळ करून त्यांचा खुंन केला त्याचा निषेध राज्यातील वकील बांधव करीत आहे.
या घटनेचा निषेध म्हणून राज्यातील वकिलांनी दिनांक 29 1 2024 रोजी न्यायालयाचे काम बंद करून निषेध व्यक्त केला आहे,, राज्यातील अनेक न्यायालयात आजही काम बंद करून निषेध नोंदविला जात आहे .अहमदनगर जिल्ह्यातील सर्व न्यायालयाचे कामकाजावर 3 फेब्रुवारी 24 पर्यंत न्यायालयीन कामकाज न करण्याचा ठरावही केलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील वकिलांचे वतीने खालील विषयासाठी आंदोलन चालू आहेत.
1 या संपूर्ण केसचा तपास एस आय टी या तपास यंत्रणे कडुन व्हावा,
2विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी,
3एडवोकेट प्रोटेक्शन अक्ट मंजूर व्हावा,
4अहमदनगर येथे त्वरित फास्टट्रॅक कोर्टाची नेमणूक करण्यात यावी,,, या विषयाचे निवेदन अहमदनगर उत्तर विभागाचे वतीने बुधवार दिनांक 31जानेवारी20 24 ,रोजी दुपारी बारा वाजता शिर्डी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालय येथे वरील विषयाचे मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे त्यानंतर एक दिवशीय धरणे आंदोलन राहता न्यायालय परिसरात होणार आहे तरी या संवेदनाशील विषयाची बातमी घेण्यासाठी तुम्ही दुपारी बारा वाजता शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय अथवा राहाता न्यायालय परिसरात यावे ही विनंती
करण्यात आली आहे
ॲड .नितीन विखे अध्यक्ष राहाता वकील संघ