कत्तलीसाठी जनावरे घेवून जाणारा टेम्पो टाकळीभान येथे पकडला.
टाकळीभा(सत्तेचा महासंग्राम न्युज)
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील हाॅटेल साई गायत्री समोर श्रीरामपूरकडून नेवासाकडे कत्तलीसाठी जनावरे घेवून जाणारा टेम्पो येथील हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवार दि.२७ एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते १० वाजेच्या सुमारास पकडला.
याबाबतचे वृत्त असे की, श्रीरामपूर कडून नेवासाकडे जाणार्या टेम्पो क्रमांक(एम एच १६ ए ई ५७०२) या वाहनातून दोन देशी जातीचे बैल व दोन जर्शी गायी असे एकून चार जनावरे कत्तलीसाठी घेवून जात असल्याचे टाकळीभान येथील हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यानूसार सदर कार्यकर्त्यांनी त्या वाहनाचा पाटलाग करून येथील चारी नं १६ नजीक असलेल्या हाॅटेल साई गायत्री समोर हा टेम्पो पकडला. असता त्यात वरील प्रमाणे चार जनावरे आढळून आले. या घटनेची माहीती श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना भ्रमनध्वनीवरून देण्यात आली. तद्नंतर पो.हे.काॅ.अर्जून बाबर व पोलीस मित्र बाबा सय्यद यांनी घटनास्थळी भेट देवून सदर वाहन व जनावरे ताब्यात घेवून पंचनामा केला. या टेम्पोत देशी जातीचे दोन बैल व दोन जर्शी गायी कत्तलीसाठी नेवासाकडे घेवून जात असल्याचे आढळून आले. याप्रकरणी टेम्पो चालक व टेम्पो मालक यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर वाहन पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून पुढील तपास पो.नि.दशरथ चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.काॅ.बाबर हे करीत आहे.
हल्ली मोठ्या प्रमाणात गोहत्या होत असून ठिकठिकाणी कत्तलीसाठी जनावरे घेवून जाणारे वाहने पकडले जात असले तरी गोहत्याचे प्रमाण मात्र वाढतच आहे. टाकळीभान येथील हिंदूत्ववादी तरूणांच्या सतर्कतेमुळे या जनावरांची कत्तलीपासून सुटका झाली आहे. यापुर्वीही गुजरवाडी शिवारात याच तरूणांनी कत्तलीसाठी जाणार्या जनारांची सुटका केली होती. तरूणांनी केलेल्या गोमाता बचावाच्या या कामामुळे त्यांचे परिसरातून कौतूक केले जात आहे.