रेशनचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे पर्यायी व्यवस्था करा…गोरख दादा गवारे
बाभळेश्वर (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील बाभळेश्वर सह संपूर्ण तालुक्यात रेशनच्या सर्व्हर डाऊनची रोजची समस्या झाली आहे. लाभार्थ्यांना धान्य घेण्यासाठी तासंतास वाट पाहावी लागतेय. गेल्या महिना दोन महिन्यांपासून रेशनचं सर्व्हर कधी बंद तर कधी सुरु असते. सर्व्हर डाऊन असल्याने बायोमेट्रीक मशीन बंद होत आहे. त्यामुळे याला पर्यायी व्यवस्था निर्माण करून लाभार्थ्यांची गैरसोय दूर करावी अशी मागणी माहिती अधिकार संघर्ष समितीचे अध्यक्ष गोरखदादा गवारे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
रेशन सर्व्हर डाऊनची रोजची समस्या झाली आहे बायोमेट्रीक मशीन बंद होऊन त्याचा धान्य वितरणाला मोठा फटका बसतोय, धान्य वितरणात अडचणी येतात, असं रेशन दुकानदार यांच म्हणण आहे. गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी बायोमेट्रीक पद्धती अवलंबली जाते. पण, सर्व्हर डाऊनचा ग्राहकांना आता संताप आलाय. रेशनसाठी लोकं रांगेत उभे राहतात. कधीकधी दुकानदारांशी भांडण होतात. मनस्ताप सहन करूनही धान्य मिळत नाही.
गेल्या काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यानं रेशन दुकानांसमोर गर्दी होती. ग्राहकांना तास दोन तास रांगेत उभे लागावे लागले. रोज रोज दुकानात सर्व कामधंदे सोडून जायचे तरीही धान्य मिळत नसतील, तर काय करायचे असा संपात ग्राहक व्यक्त करत आहेत. तर सर्व्हर डाऊन असल्याने धान्य विक्री करताना त्रास होत असल्याचं रेशन दुकानदार म्हणातात. ग्राहक आणि दुकानदार दोघेही यामुळं त्रस्त आहेत.
त्यामुळे याची दखल घेवून रेशन वितरणासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी गवारे यांनी केली आहे.