Breaking
ब्रेकिंग

पुणतांबा जंक्शन स्टेशनवर सर्व जलद रेल्वे व शिर्डीला जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वे थांबाव्यात यासाठी पुणतांबा येथे ग्रामस्थांचे स्वातंत्र्यदिनी रेल रोको आंदोलन! आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित!

0 9 1 3 8 2

 

 

शिर्डी (राजकुमार गडकरी)

दौंड मनमाड या रेल्वे मार्गावर पुणतांबा जंक्शन स्टेशनवर सर्व जलद रेल्वे तसेच शिर्डीला जाणाऱ्या येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या थांबाव्यात .या मागणीसाठी पुणतांबा व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने भारताच्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी पुणतांबा रेल्वे स्टेशन येथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. पुणतांबा गाव बंद ठेवून व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार ,कामगार ,शेतकरी युवक, महिला वर्ग ही या रेल्वे रोको आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. यावेळी रेल्वेचे पोलीस व इतर रेल्वे अधिकाऱ्यांनी याआंदोलन कर्त्यांची भेट घेतली व आपल्या मागण्या संदर्भात रेल्वेच्या वरिष्ठांनी काही तातडीने निर्णय घेतल्याचे सांगून आपल्या मागणीप्रमाणे रेल्वेच्या काही टेक्निकल गोष्टी पूर्ण झाल्यानंतर तीन जलद रेल्वे गाड्यांना येथे थांबा दिला जाईल. असे आश्वासन दिले असून येत्या 21 तारखेला इतर मागण्यांसाठी रेल्वेच्या मुख्य अधिकारी डीआरएम व सर्व स्टॉप यांच्या समवेत आंदोलक शिष्टमंडळाची बैठक घेऊन इतर मागण्यां संदर्भात चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. असे आश्वासन दिल्याने हे रेल्वे रोको आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे यावेळी मा. जिल्हा परिषद सदस्य व मा.सरपंच डॉक्टर धनंजय धनवटे यांनी सांगितले.

दरम्यान स्वातंत्र्यदिनी दौंड मनमाड या रेल्वे मार्गावर पुणतांबा येथे हजारोंच्या संख्येने ग्रामस्थांनी रेल्वे मार्गावर उपस्थित राहून रेल्वे रोको आंदोलन केले. पुणतांबा हे ब्रिटिशकालीन रेल्वे स्टेशन असून हे जंक्शन स्टेशन झाले आहे. येथून अनेक रेल्वे गाड्या धावतात. पण थांबत नाहीत. पुणतांबा येथून शालेय शिक्षणासाठी विद्यार्थी इतर ठिकाणी जातात .त्याचप्रमाणे पुणतांबा येथून नगर पुणे नासिक मुंबई या ठिकाणी अनेक शासकीय, निमशासकीय ,खाजगी कर्मचारी हे रेल्वेने अप डाऊन करतात. मात्र जलद रेल्वे गाड्या येथे थांबत नसल्यामुळे त्यांची मोठी पंचायत होते .शिर्डीला येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे गाड्या थेट पुणतांब्याला न थांबता शिर्डीला थांबतात. त्यामुळे बाहेरून आलेले प्रवासी यांना पुणतांब्याला उतरायचे असते मात्र रेल्वे थांबत नसल्यामुळे थेट शिर्डीला जावे लागते .रात्री शिर्डीला उतरल्यानंतर परत पुणतांबाला येणे मोठे कठीण काम असते. त्याचप्रमाणे येथे रेल्वे थांबत नसल्यामुळे पुणतांबा गावचा विकास, आर्थिक उलाढाल त्यावरही मोठा परिणाम झाला आहे. या सर्व दृष्टिकोनातून पुणतांबा रेल्वे जंक्शन स्टेशनवर मनमाड दौंड या मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या तसेच शिर्डीला जाणाऱ्या येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या थांबाव्यात याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 15 ऑगस्ट 2024 गुरुवार रोजी पुणतांबा व पंचक्रोशीतील सर्वपक्षीय व सर्व थरातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन भारत माता की जय, वंदे मातरम म्हणत, हातात तिरंगा झेंडा घेत रेल्वे मार्गावर उतरून, रेल्वे मार्गावर झोपून भव्य असे रेल्वे रोको आंदोलन केले. रेल्वे रोको आंदोलन व गाव बंद ठेवून रेल्वे प्रशासनाकडे जलद रेल्वे गाड्या येथे थांबवण्यात व येथे ऑनलाईन रेल्वे बुकिंग सेवा सुरू करावी ,माल धक्का करावा, आदी विविध मागण्या कडे लक्ष वेधण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले की, पुणतांबा हे ब्रिटिश कालीन रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशन साठी येथील शेतकऱ्यांनी येथील व्यापारी पेठ मोठी होईल आर्थिक उलाढाल वाढेल. या दृष्टिकोनातून पूर्वी जमिनी दिले आहेत.येथे रेल्वे स्टेशनवर पूर्वी सर्व सुविधा उपलब्ध होत्या. शिर्डीला‌ जाणाऱ्या, येणाऱ्या रेल्वे थांबत होत्या. मात्र कोरोना नंतर येथे जलद रेल्वे व शिर्डीला जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वे थांबत नाहीत. त्यामुळे येथील व्यापारपेठ उध्वस्त होत आहे .प्रवाशांना ,विद्यार्थ्यांना कामगार, शेतकरी ,महिला यांना बाहेरगावी जाण्यासाठी त्यामुळे मोठी अडचण होते. तरी येथे जलद रेल्वे थांबाव्यात व त्वरित रेल्वे प्रशासनाने निर्णय घ्यावा. यासाठी हे रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले असून यापुढेही जर इतरमागण्या मंजूर झाल्या नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही पुणतांबा व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने बाळासाहेब चव्हाण यांनी दिला आहे. दरम्यान यावेळी आंदोलकांची रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली. व वरिष्ठांच्या निर्णयासंदर्भात चर्चा केली.

यावेळी रेल्वेच्या वरिष्ठअधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वानासंदर्भात पुणतांबा गावचे माजी सरपंच व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर धनंजय धनवटे यांनी सांगितले की, रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनाची दखल घेत तातडीने काही निर्णय घेतले असून दौंड मनमाड रेल्वे मार्गावर धावणारी महाराष्ट्र एक्सप्रेस तसेच अमरावती एक्सप्रेस, त्याचप्रमाणे दादर शिर्डी एक्सप्रेस या तीन जलद रेल्वे गाड्यांना काही टेक्निकल गोष्टी पूर्ण झाल्यानंतर येथे थांबा देण्यात येईल. त्याचप्रमाणे आंदोलकांच्या मागणीनुसार झेलम एक्सप्रेस ला थांबा देण्यासाठी दिल्ली रेल्वे बोर्डाची परवानगी घ्यावी

लागेल तसेच दक्षिण विभागातील चेन्नई एक्सप्रेस ,विशाखापट्टणम एक्सप्रेस ,काकीनाडा एक्सप्रेस यांना टेक्निकल अडचणी असून त्या सोडवण्यासाठी तसेच इतर मागण्या संदर्भात आंदोलकांच्या शिष्टमंडळाला 21 तारखेला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीसाठी बोलवले असून येथे सर्व रेल्वेचा स्टॉप उपस्थित राहून इतरमागण्या संदर्भात मार्ग काढण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आल्यामुळे पुणतांबा येथील रेल्वे रोको आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे यावेळी डॉक्टर धनंजय धनवटे यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे