वराती आधी जेवण केलेल्या 52 पाहुणे मंडळींना झाली विषबाधा ! राहाता तालुक्यातील राजुरी येथे घडली घटना.
राजुरी (वार्ताहार)
लग्न समारंभ उरकून घरी परतलेल्या पाहुणे मंडळींना वराती अगोदर जेवण केल्यानंतर काही वेळाने त्रास होऊ लागल्यामुळे 52 पाहुणे मंडळींना करावे लागले हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्याची घटना राहता तालुक्यातील राजुरी येथे घडली आहे . याबाबतची मिळालेली माहिती अशी की राहता तालुक्यातील राजुरी येथील प्रगतशील शेतकरी व राजुरी गावचे तंटामुक्ती समिती उपाध्यक्ष जालिंदर मच्छिंद्र पठारे यांच्या मुलांचा लग्न समारंभ होता.लग्न समारंभ झाल्यानंतर वधू व वरा सह आपले घरातील पाहुणे मंडळी आपल्या घरी सुखरूप परतले होते.यानंतर पठारे यांच्या वस्तीवरच वरातीचे नियोजन करण्यात आले होते.यामध्ये वराती आधी पाहुणे मंडळींना जेवण केलेले होते.या जेवणानंतर अंदाजे रात्री ९ ते १० च्या दरम्यान वरातीला सुरुवात झाली.वरात सुरू असतानाच काहीं पाहुणे मंडळींना त्रास होऊ लागल्यामुळे या घरातील पाहुणे मंडळींची मोठी धावपळ उडाली हे कशामुळे झाले व का होत आहे हे न समजल्यामुळे अनेकांना तातडीने प्रवरा हॉस्पिटलला रात्री ऍडमिट केले. या मध्ये 50 ते 55 पुरुष महिला मुले असून या घडलेल्या घटनेमुळे राजुरी व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे .मात्र हे कशामुळे घडले व कसे घडले याची मात्र माहिती मिळू शकली नाही.परंतु संध्याकाळी12 ते 13 जणांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळणारअसल्याची माहिती मिळाली असून.उर्वरित नागरिकांना उद्या सकाळी डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे .