राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार ,यांच्यासह ना. अनिल पाटील, खा.तटकरे, महिला आयोगाचे अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी घेतले साईबाबांचे दर्शन! सगळ्यांचं चांगलं व्हावं ,भलं व्हावं असं साईबाबांना घातलं साकडं– ना.अजित पवार
शिर्डी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजित पवार यांनी आज शनिवार 10 ऑगस्ट रोजी सकाळी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार अनिल पाटील, मा. खा. सुनिल तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आ. आशुतोष काळे आदी उपस्थित होते.
साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा शाल व श्री साई मुर्ती देवून सत्कार केला. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते. त्याचप्रमाणे त्यांच्या पक्षाचे काही कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना मनमोकळेपणाने अनेक प्रश्नांवर हसत खेळत उत्तरे दिली. श्री साईबाबांकडे काय आशीर्वाद मागितले असे विचारताच काही नाही, तुझ्या संगट सगळ्यांचं चांगलं व्हावं, सगळ्यांचं भलं व्हावं असं हसत मिश्किलपणे त्यांनी उत्तर दिलं. महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आनंद समृद्धी मिळो असे त्यावेळी ते म्हटले. तसंच आपण साकडं घातलं तरी मतदार राजा हा प्रमुख आहे. मतदार राजाच्या मनात जे असतं ते घडतं. त्यामुळेच या जन सन्मान यात्रेद्वारे आम्ही मतदार राजांकडे जात आहोत .असं सांगत जन सन्मान यात्रेचा हा तिसरा दिवस असून या जनसमान यात्रेत जी जी श्रद्धास्थाने, तीर्थस्थाने आहेत. या ठिकाणीही जाऊन आम्ही आशीर्वाद घेणार आहोत .आज शिर्डीत येऊन श्री साईबाबांचे आशीर्वाद घेतले .यानंतर सिन्नर, कोपरगाव येथे जाणार आहोत. असे सांगत सरकारमध्ये समावेश झाल्यानंतर सरकार राबवत असणाऱ्या विविध योजना त्यांची माहिती देण्याचे काम या जन सन्मान यात्रेतून करत आहोत. काही ठिकाणी पाऊस आहे तर काही ठिकाणी पाऊस नाही तरी ही जन सन्मान यात्रा आम्ही पूर्ण करणार आहोत. या जनसन्मान यात्रेला सर्वच ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांवर केलेली टीका भवली का असे विचारताच मागील घटना, मागील झालं ते गेलं गंगेला मिळालं, नव्या उमेद्यीने आम्ही विकास, अर्थसंकल्प ,युवा युवती गरीब ,शेतकरी, कामगार, माय माऊली यांचे विकासासंदर्भात अधिक लक्ष देत असून जे काही महायुती संदर्भातील अंतर्गत विषय प्रश्न आहे ते जाहीर बोलण्यापेक्षा महायुतीमध्ये त्या संदर्भात चर्चा होती व करत असतो. असे त्यांनी यावेळी सांगितले. साई संस्थानच्या विश्वस्त नियुक्ती संदर्भात न्यायालयात हा विषय असून सध्या येथे साई संस्थान मध्ये सेवा देणारे अधिकारीही चांगले काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पुढे ते म्हणाले की बऱ्याचदा असं होतं की आम्ही काही बोललो नाही तरी ते आमच्या तोंडी घातलं जातं असेही त्यांनी सांगत आज इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया अगदी तत्पर आहे व त्यांनी तत्पर राहणं याचं मी स्वागतच करतो. असेही त्यांनी एका प्रश्नावर मिस्कील पणे उत्तर दिलं. यावेळी नामदार अनिल पाटील, खासदार सुनील तटकरे, महिला आयोगाचे अध्यक्षा रूपालीताई चाकणकर हे उपस्थित होते.