लोणी खुर्द येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ . अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.
लोणी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
०१ ऑगस्ट २०२४ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती लोणी खुर्द येथे मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली, जयंती सोहळ्याचे प्रमुख अतिथी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे मा. सदस्य डॉ. सुजयदादा विखे पाटील होते तसेच जयंतीचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गीतकार श्री सोनु साठे यांचा बहारदार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
सदर प्रसंगी लोणी खुर्द गावातील श्री शरद आहेर, श्री सचिन आहेर, श्रीकिसन आहेर, श्री संतोष आहेर, असलम शेख आदी ग्रामस्थ उपस्थित होते तसेच जयंती उत्सवात साजरी व्हावी यासाठी लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती अध्यक्ष श्री अमोल जगधने, दिलीप जगधने, श्री सागर राक्षे, विकी राक्षे, भाऊसाहेब जगधने, कुणाल जगधने, कुबेर जगधने, अक्षय जगधने, प्रेम जगधने, गणेश जगधने आदींनी खूप मेहनत घेतली आणि शेवटी समिती अध्यक्ष श्री अमोल जगधने यांनी उपस्थित मान्यवरांचे व ग्रामस्थांच्या आभार मानले.