मराठा आरक्षणासाठी सावळीविहीर गाव बंद ठेऊन एक दिवशीय उपोषण
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश जी आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविल्यामुळे सावळविहिर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जाहीर .आभार ..सरपंच.. ओमेश जपे
मराठा आरक्षणासाठी सावळीविहीर गाव बंद ठेऊन.1 दिवसीय उपोषण.
शिर्डी (सत्तेचा महासंग्राम वृत्तसेवा)
राजेंद्र दूनबळे
सकल मराठा समाजाच्या वतीने
मराठा आरक्षणासाठी सावळीविहीर गाव बंद चा इशारा करून मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देत एक दिवसीय उपोषणाला सुरुवात करण्यात आली यामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी होऊन मराठा आरक्षण लवकर मंजूर करा याविषयी मागणी केली सकाळी नऊ वाजे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ येऊन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जय जिजाऊ जय शिवाजी. एक मराठा लाख मराठा. या घोषाने परिसर दणाणून सोडला. कार्यकर्ते या ठिकाणी येऊन आपले मनोगत त्यांनी यावेळेस व्यक्त केले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे तो आमचा अधिकार आहे आणि जर शासनाने जर आरक्षण मिळवून दिले नाही तर याचे गंभीर स्वरूप शासनाला पहावयास मिळेल. मतांच्या झोळी भरण्यासाठीच फक्त आमचा उपयोग केला जात आहे आतापर्यंत झालेल्या या सगळ्याच निवडणुकांनी सगळ्यात राजकारणी याचा उपयोग करून घेतलेला आहे यापुढे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. असा इशाराही यावेळेस मराठा समाजाच्या वतीने शासनाला देण्यात आला. मराठा समाजात अनेक गरीब कुटुंब असून त्यांना नोकऱ्या नाही काम धंदे नाही शिक्षणापासून वंचित आहे अशांना आरक्षण मिळाले पाहिजे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला.राज्यातून पाठिंबा मिळत आहे. आज राहता तालुका पूर्ण बंद ठेवण्यात आला होता. यामध्ये शिर्डी साईबाबा च्या पदस्पर्शाने पावन झालेली शिर्डी महानगरी ही सुद्धा बंद ठेवून मनोज दरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे .एवढेच नव्हे तर येणाऱ्या शिर्डी मधील साई भक्तांना कोणत्याही परिस्थितीत कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता ही घेण्यात आली होती. तरी शासनाने लवकरात लवकर मराठा आरक्षणाची कोंडी सोडवावी व मराठा आरक्षणाला न्याय द्यावा अशी भूमिका सर्व कार्यकर्त्यांची असून सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सदर उपोषण करणार असून सहा वाजेनंतर कॅण्डल मार्च चा फेरी सावळी गावात होणार आहे त्याचप्रमाणे सर्व पक्षांकडून शासनाचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे ग्रामस्थ व. सावळीविहीर गावचे सरपंच ओमेश साहेबराव जपे यांनी वंचित बहुजन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आयुष्यमान प्रकाश जी आंबेडकर यांचे धन्यवाद मानले असून त्यांनीही या मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे या बद्दल.प्रकाश जी आंबेडकरांचे ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले आहे याप्रसंगी बाळासाहेब जपे . रमेश आगलावे.सावळीविहिर खुर्द.चे.सरपंच अशोकराव जमधडे शिवसेनेचे नेते विजुभाऊ काळे. युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप वीघे. उपसरपंच विकास जपे. शांताराम जपे .गणेश आगलावे. गणेश कापसे. सोपानराव पवार. अनिल वाघमारे.पत्रकार राजेंद्र दुनबळे. राजेंद्र गडकरी . रमेश कसबे. संजय दहीवाड. जगन्नाथ पाटील .प्रमोद कोपरे. रवी झुरळे. किरण जपे. दिनेश आरणे. विक्रम आगलावे. साईनाथ झिंजाड. संजय मिश्रा. या.सह अमरदीप युवक संघटना .साईराज प्रतिष्ठान सावळी वीहिर चे कार्यकर्ते . व्यापारी संघटना. ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.