समाजाला शिक्षण सामाजिक आरोग्य संस्काराच्या माध्यमातून माणूस घडविण्यात फा. अंकुश फा. साळवे फा. दिब्रिटो यांचे योगदान महत्त्वाचे — डॉ जयश्रीताई थोरात
संगमनेर (प्रतिनिधी)
समाजाला शिक्षण सामाजिक आरोग्य संस्काराच्या माध्यमातून माणूस घडविण्यात फा.अंकुश, फा.साळवे, फा.दिब्रिटे यांचे योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन एकविरा फौँडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांनी केले. ज्ञानमाता विद्यालय हॉलमध्ये वरील धर्मगुरुंना श्रद्धांजली अर्पण करतांना त्या बोलत होत्या सुरुवातीची प्रार्थना रेव्ह.जॉर्ज चोपडे यांनी केली तर प्रास्ताविक लॉरेन्स गायकवाड यांना केले. फा.पिटर अंकुश, फा.थॉमस साळवे, फा.फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या कार्याविषयी फा.ज्यो गायकवाड, फा.फान्सिस पटेकर. के.डी.भोसले यांनी माहिती दिली.
डॉ.जयश्रीताई म्हणाल्या की, फा.दिब्रिटो यांनी सर्व समावेशक समाजाला न्याय देऊन त्यांना विकास प्रवाहात आणले असून साहित्य, पर्यावरण, सामाजिक, राजकिय, धार्मिक क्षेत्रा बरोबरच हरित वसईच्या निर्मितीसाठी त्यांचे योगदान उल्लेखनिय असल्याचे त्यांनी सांगीतले.
श्रद्धांजलीपर कार्यक्रमात अदिवासी सेवक प्रा.बाबा खरात, ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, फा.प्रशांत शहाराव, अँड. प्रसाद सांगळे, अन्तून घोडके, वाल्टर कांबळे, प्रकाश अमोलीक, सि.शैला पंडित, अरविंद गाडेकर, नंदकिशोर बेल्हेकर आदींनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रविण रोहोम, विजय खंडीझोड, श्रीधर भोसले, फा.रॉबर्ट डिकोस्टा, फा.लोबो, फा.जयसिंग, प्रभाकर चांदेकर, प्रा.सी.एम.साळवे, सचिन सोनवणे, सचिन मुन्तोंडे, सुखदेव शेळके, रमेश ओहोळ आदीसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.