घोगरगाव येथील वयोवृद्ध महिला यांचे आठ दिवसापासून आमरण उपोषण.
लोहगाव (सत्तेचा महासंग्राम न्युज)
घोगरगाव येथील वयोवृद्ध महिला व लहुजी शक्ती सेनेचे रस्त्यासाठी आठ दिवसापासून आमरण उपोषण..
नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील दलित मागासवर्गीय वयोवृद्ध महिला व लहुजी शक्ती सेनेच्या वतीने गेल्या आठ दिवसापासून घोगरगाव ग्रामपंचायत समोर लक्षणीय उपोषण सुरू असून, उपोषण करती महिलाची तब्येत चिंताजनक,
त्यांनी निवेदनात म्हटले आहे ,की मी शकुंतला अण्णासाहेब कणगरे (वय ७२) घोगरगाव तालुका नेवासा येथील रहिवासी असून आमच्या दलित मागासवर्गीय कणगरे कुटुंबाला त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवण्यात येत असून सन २०१८ ते २०२४ पर्यंत सतत दबावतंत्राचा वापर करून जाणीवपूर्वक रस्ता अडवणूक करून आमची शेती पडीक पाडली जात आहे.
त्यामुळे मुले शिक्षणापासून वंचित आहेत. माझ्याच क्षेत्रामध्ये रस्ता जाण्या येण्यासाठी तहसीलदार यांचा आदेश असून देखील तसेच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्त्याचा ठराव मंजूर होऊन त्यास निधी असून देखील तो रस्ता आमच्या जाण्या येण्यासाठी खुला झाला नाही, त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे व मी व लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आम्हाला योग्य तो न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार आहे असे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे. गेल्या आठ दिवसापासून उपोषण कर्त्यांचे उपोषण सुरू असून त्याची प्रशासनाने अद्याप कोणी दखल घेतली नाही ,याबाबत परिसरात चर्चा होत आहे.