राहुरीत पत्रकाराच्या घरावर मध्यरात्री हल्ला, जिवंत जाळण्याचा प्रयत्न, विविध संघटनांकडून प्रशासनाला निवेदन
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
प्रतिनिधी बाळकृष्ण भोसले
राहुरी : राहुरी येथील ज्येष्ठ पत्रकार निसार सय्यद यांच्या घरावर काल मध्यरात्री हल्ला करून वाहनांची तोडफोड करत जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेतील समाज कंटकांना तात्काळ अटक करण्यात यावी. यासाठी आज पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
राहुरी येथील वंचित बहुजन आघाडी, सत्यशोधक लहूजी क्रांती सेना, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, विद्रोही विद्यार्थी संघटना आदि संघटनांकडून आज दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, काल दिनांक १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री ज्येष्ठ पत्रकार निसार सय्यद यांच्या घरावर काही समाज कंटकांनी हल्ला करून तोडफोड करत दोन चारचाकी वाहने पेटवून दिले. तसेच घराच्या खिडकीमधून पेट्रोलच्या पिशव्या व बोळे फेकून घरातील लोकांना जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी राहुरी शहरात झालेल्या मोर्चाचा हा परिणाम असण्याची दाट शक्यता आहे. तसेच ज्येष्ठ पत्रकार निसार सय्यद यांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी. या घटनेची सखोल चौकशी करून घटने मागे असलेल्या सूत्रधाराचा शोध घ्यावा. तालूक्यात या अगोदर घडलेल्या मुस्लिम विरोधातील घटनांचा संबंध या घटनेशी असण्याची दाट शक्यता असून आरोपी देखील एकच असण्याची शक्यता आहे. या पद्धतीने घटनेचा तपास करावा. तालूक्यात हिंदूत्ववादी संघटनांनी चालवीलेल्या हालचालींमुळे सामाजिक वातावरण दुशित बनले आहे. त्यामुळे हिंदूत्ववादी संघटनांवर निर्बंध घालावेत. असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर अनिल जाधव, डाॅ. जालिंदर घिगे, निलेश जगधने, कांतीलाल जगधने, किरण साळवे, इम्रान देशमुख, साईनाथ बर्डे, पिंटूनाना साळवे, इम्रान सय्यद, बाबासाहेब साठे, रफिक सय्यद, वसीम पठाण, किरण विधाटे, आदित्य साळवे, महेश साळवे, रियाज पठाण, मजर पठाण, सोहेल शेख, एजाज पठाण, इम्रान खान, पापाभई सय्यद, अलीम पठाण, खालिद शेख, रियाज शेख, अय्याज शेख, शहेबाज पठाण, अरबाज शेख, अलफैज शेख, शादाब पठाण, सज्जाद शेख, अजहर पठाण, अब्दुल शेख आदिंच्या सह्या आहेत.