पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचे ज्ञान महत्त्वाचे असते…. सौ शालिनीताई विखे पाटील
पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचे ज्ञान महत्त्वाचे असते. राहाता तालुक्यात चाळीस हजार पेक्षा जास्त महिलांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे… सौ शालिनीताई विखे पाटील
शिर्डी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
राजेंद्र दूनबळे.
पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचे ज्ञान महत्त्वाचे असते. राहता तालुक्यात चाळीस हजार पेक्षा जास्त महिलांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे अशी प्रतिपादन अहमदनगर जिल्ह्याच्या माजी जिल्हा परिषद च्या अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांनी सावळीवीहिर येथे केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सावळीविहीर कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी सावळिविहीर
सरपंच ओमेश जपे. उपसरपंच विकास जपे.महाराष्ट्र राज्याचे सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे. ग्रामविकास अधिकारी कार्ले. भाऊसाहेब.तलाठी श्रीमती अपर्णा शिलावंत.
माजी सरपंच सोपानराव पवार. सावळीविहिरचे तंटामुक्ती अध्यक्ष जिजाबा आगलावे.मा माजी सरपंच सौ रुपाली ताई आगलावे. माजी उपसरपंच सौ वृशालीताई जपे.
गणेश आगलावे. राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे. पोलीस पाटील संगीताताई वाघमारे. सुरेश वाघमारे. पत्रकार राजेंद्र दुनबळे.संजय जपे. डॉ. कोठाळे मॅडम. सय्यद सिस्टर. कचवे मॅडम. संगीता फाजगे. योगिता त्रिभुवन. कसाब. रंजना आगलावे. ग्रामपंचायत सदस्य. कर्मचारी वृद याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते .सावळीविहिर ग्रामपंचायतीच्या वतीने सौ शालिनीताई विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे अनेक अंगणवाडी व बचत गटाच्या वतीने सौ शालिनीताई.. विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.सावळीविहीर येथे येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायतच्या वतीने सावळविहीर येथे हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या प्रसंगी सौ शालिनीताई विखे पाटील पुढे म्हणाले की महिलांना सक्षमी करण्यासाठी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहे महिला पुढे आल्या तर त्यांचा आर्थिक विकास होईल .मोदी साहेबांनी राम लल्ला ची प्राणप्रतिष्ठा करून भव्य असे श्रीराम मंदिर अयोध्या मध्ये उभारले. ज्या महिलांचे उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे त्यांच्या मुलींसाठी मोफत शिक्षणाची तरतूद या शासनामार्फत होणार आहे. विखे पाटलांनी चाळीस कोटीचा निधी आणून आरोग्यासाठी लागणाऱ्या 20 ते 30 वस्तू लोकांसाठी
शिबिरात मिळवुन दिले आहे. त्याचप्रमाणे राहता तालुक्यात जवळजवळ चाळीस हजार महिलांना कामे देण्यात आली आहे.
शासनाने 100 कोटी रुपये मोदींनी मंजूर केले असता त्यातील 40 ते 50 कोटी रुपये खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी विकास निधी आणला आहे. जनसेवा फाउंडेशन च्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी व इतर उत्पादकांसाठी ही वेगवेगळे प्रकल्प राबविण्यात येत आहे. महिलांनी एकत्र येऊन उद्योग सुरू करा व त्या संदर्भातील माहिती जनसेवा फाउंडेशनच्या वतीने त्यांना देण्यात येईल व याचा त्यांना लाभ होईल. असे त्यानि सांगीतले. सावळीवीहीर बचत गटांना व अपंग महिलांनाही चेक चे वाटप सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला दिनाची अवचित साधून शालिनीताई विखे पाटील यांनी सर्व महिला मंडळांना शुभेच्छा दिल्या.यावेळी महिला मंडळ.बचत गट महिला.अंगणवाडी सेविका .ग्रामपंचायत सदस्य.मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रम झाल्यानंतर सभामंडपात फराळ चा कार्यक्रम करण्यात आला
आलेल्या सर्व महिलांना वान म्हणून ताटाचे वाटप करण्यात आले.