श्रीक्षेत्र रुई येथून काशी, अयोध्यासाठी सुमारे 140 भाविक उत्साहात रवाना! सौ धनश्रीताई विखे पा.यांनी तीर्थयात्रेच्या प्रवासी वाहनांचे पूजन व श्रीफळ वाढवून सर्व यात्रेकरूंना दिल्या शुभेच्छा!
शिर्डी (प्रतिनिधी )
राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र रुई येथून सुमारे 140 भाविक श्री काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी व श्री राम लल्लाचे व भव्य नवनिर्मित राम मंदिर दर्शन करण्यासाठी अयोध्या या तीर्थयात्रेसाठी मोठ्या उत्साहात आज गुरुवारी रवाना झाले आहेत. या सर्व भाविकांना धनश्री सुजय विखे पाटील यांनी रुई येथे येऊन व तीर्थयात्रांच्या वाहनांची पूजन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र रुई हे धार्मिक असे गाव असून येथे दरवर्षीप्रमाणे हरिनाम सप्ताह, विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात .यावर्षीही हरिनाम सप्ताह श्रावण महिन्यात संपन्न झाला. यावेळी काशी ,अयोध्या दर्शन अशी भाविकांसाठी सहल आयोजित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून या तीर्थयात्रेचे नियोजन करण्यात येत होते. या काशी व अयोध्या तीर्थयात्रेचा प्रारंभ नुकताच सौ धनश्रीताई विखे पा. यांच्या हस्ते तीर्थयात्रा प्रवासी वाहनांचे पूजन करून व श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी धनश्री ताई विखे पाटील यांनी येथील ज्ञानेश्वर तुरकणे व अडसुळे यांनी मोठे परिश्रम घेऊन ही तीर्थयात्रा आयोजित केली. त्यामुळे येथील भाविक महिलांना व पुरुषांना काशी व अयोध्येचे सुलभ दर्शन घेता येईल .हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत. असे यावेळी सांगितले. तर साई निर्माण ग्रुपचे पंकज लोढा यांनी यावेळी सांगितले की, ही तीर्थयात्रा काशी, अयोध्यासाठी असून पाच ते सात दिवसांची आहे. यासाठी ज्ञानेश्वर तुरकणे सुभाष अडसुळे विकास निकम आदींनी मोठी मेहनत घेतली आहे. त्यांच्या नियोजन व कामाची पद्धत अतिशय चांगली आहे .देवदर्शन करून ही यात्रा सुखरूप पणे परत यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तसेच सर्व यात्रेकरूंना रुई ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा आहेत. असे सांगितले.
यावेळी रुईच्या सरपंच शितल वाबळे यांनी सौ धनश्री विखे पाटील यांचा सत्कार केला. यावेळी सरपंच शितल वाबळे, माजी सरपंच संदीप वाबळे, साई निर्माणचे पंकज लोढा, राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब शिरसाट ,रुई गावकरी मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब शिरसाठ आदींसह ग्रामस्थ ,यात्रेकरूंचे नातेवाईक आदी उपस्थित होते.