Breaking
ब्रेकिंग

टाकळीभान येथील सोळा चारी व टेल टॅंक चारी दुरूस्ती साठी लाभ धारक शेतकरी यांचे विभागीय कार्यालया समोर उपोषण

0 9 1 3 7 7

सत्तेचा महासंग्राम

ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया

 

 

टाकळीभान  (सत्तेचा महासंग्राम न्युज)

 

 

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील 16 चारी व टेलटॅंक चारी दुरुस्तीसाठी पोकलँड मशीन मिळवून देण्यात यावे या मागणीसाठी लाभ धारक शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभाग कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे
दिलेल्या अर्जात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की,16 व टेल टॅंक चारी लाभधारक शेतकरी असून 4 नोव्हेंबर 2023 रोजी पाटबंधारे उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर यांच्याकडे अर्ज दिला होता. पण दिलेल्या अर्जानुसार टेल चारी व 16 चारी दुरुस्तीसाठी 17 नोव्हेंबर 2023 रोजी दिलेल्या अर्ज नुसार दि.4/12/2023 पर्यंत जेसीबी मशीन द्वारे चारीचे काम चालू होते. परंतु 4 नोव्हेंबर 2023 पासून जेसीबी मशीन हे काम अपूर्ण सोडून दुसरीकडे गेले. पण 16 चारी व टेल टॅंक चारी लाभधारक शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे राहिलेले काम पोकलँड मशीन द्वारे पूर्ण करावे तसेच विविध चारी गेट, व कुंड्या यांचे बांधकाम करून मिळावे न मिळाल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता उपोषणास बसणार आहोत पण अर्जाची कोणतीही दखल पाट बंधारे विभाग यांनी न घेता शेवटी येथील ला धारक शेतकऱ्यांना या मागणी करिता काकासाहेब कोकणे, पंकज पटारे, विलास बोडखे, संजय कोकणे, अजित थोरात व निखिल कोकणे पाटबंधारे विभाग कार्यालय श्रीरामपूर या ठिकाणी लाभ धारक शेतकरी उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 7 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे