टाकळीभान येथील प्रती पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त भाविकांची गर्दी
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील पुरातन यादव कालीन व प्रती पंढरपूर ओळखल्या जाणार्या श्री.विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात काल बुधवार दिनांक १७ रोजी आषाढी एकादशी निमित्त श्री. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची दर्शनासाठी मांदीयाळी झाली होती. त्यामुळे दर्शनासाठी मंदिरात सकाळ पासून लांबच लांब रांग लागली होती.
येथील पुरातन श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिर हे टाकळीभानसह परिसरातील गावांचे ग्रामदैवत व श्रध्दास्थान असल्याने टाकळीभान व जिल्ह्यातून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी आले होते. श्रीरामपूर येथील शेकडो डॉक्टर, वकील, महीला, व्यावसायिक यांनी पायी दिंडी काढून तर श्रीरामपुर येथील मानसोपचार तज्ञ डाॕ. संकेत मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर सायकल क्लबच्या सुमारे ७० ते ८० सदस्यांनी श्रीरामपुर ते टाकळीभान सायकल दिंडीने येवुन भल्या हाकाळी येवुन पांडुरंग चरणी माथा टेकवला. टाकळीभान पञकार संघाच्या वतीने या दिंडीतील सदस्यांचा गुलाब पुष्प देवुन सन्मान करण्यात आला यावेळी पञकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते तर माजी उपसरपंच भारत भवार मिञ मंडळाच्या वतीने खिचडी प्रसाद देण्यात आला. आषाढी निमित्त लोणी येथील विठ्ठल भक्त योगेश देशपांडे या भाविकाने एक क्विंटल खिचडीचे वाटप केले. तसेच उपसरपंच कान्हा खंडागळे व इतर भाविकांनी केळी, पेढे प्रसादाचे यांचे वाटप केले.
पहाटे ३. ३० ते ४ यावेळेत श्री. विठ्ठल रूख्मिणी मातेला गंगाजलाने व अभिषेक करण्यात आला. ४ ते ५.३० या वेळेत पूजा करण्यात आली.५.३० ते ६ वाजता या वेळेत प्रांताधिकारी किरण सावंत व सौ.मनिषा सावंत यांच्या हस्ते उत्सव मूर्तीची शासकिय पूजा व आरती करण्यात आली. पुजेचे पौरौहित्य सुदाम व प्रतीक देवळालकर गुरू यांनी केले. दुपारी १२ वाजता आरती झाली त्यानंतर भजन झाले. रात्री ८. ते १०.या दरम्यान ह. भ. प. चोरमले महाराज यांचे किर्तन झाले.
आरती नंतर प्रांताधिकारी किरण सावंत व सौ.मनिषा सावत यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष नानासाहेब पवार, बापूसाहेब पटारे आदींनी सत्कार केला. तसेच विश्वस्त बापूसाहेब पटारे यांनी येथील श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिराचा इतीहास माहितीपर पुस्तीका प्रकाशित केली त्या पुस्तीकेचे प्रकाशन प्रांताधिकारी किरण सावंत व सौ. मनिषा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलतांना प्रांताधिकारी सावंत म्हणाले की, आज मला येथील विठ्ठलाची पुजा करण्याचा दुसर्या वेळेस मान मिळाल्याने खुप आनंद झाला आहे. बापूसाहेब पटारे यांनी या पुस्तिकेतून मंदिराची सुंदर माहिती दिली असून या माहितीमुळे मंदिराचा इतीहास सर्वांना ज्ञात होईल असे सांगून पांडूरंगा भरपूर पाऊस होवून सुख समृद्धी लाभो असे साकडे आपण विठ्ठलाला घातल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामस्थ, भाविक, देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते. होमगार्ड सिमा खरोट व अल्का वाव्हळकर यांनी चोख बंदोस्त ठेवला होता. यावेळी आमदार
लहू कानडे, जिल्हा काँग्रेसचे संघटक सचिन गुजर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी सभापती डाॅ. वंदनाताई मुरकुटे यांनी विठ्ठलाच्या दर्शनाचा घेतला. भाविदांच्या मांदीयाळीने प्रति पंढरपुर नगरी गजबजुन गेली होती.
यावेळी ग्रामस्थ व भाविक व देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते, होमगार्ड सीमा खरोटे व अल्का वाव्हळकर अशोक बंदोबस्त ठेवला होता,
चौकट:- आमदार लहू कानडे यांना भविष्यात मंत्री पद भेटू अशी कार्यकर्त्यांनी विठ्ठला साखडे घातले,