Breaking
ब्रेकिंग

ठेवीदारांच्या रकमा परत मिळाव्यात सामाजिक कार्यकर्ते यांचे जिल्हा अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी

0 9 1 3 8 2

 

 

 

 

अहमदनगर (सत्तेचा महासंग्राम न्युज)

 

श्रीनाथ मल्टीस्टेट अर्बन को -ऑप.क्रेडिट सोसायटी लि.चे चिचोंडी पाटील शाखेतील

ठेवीदारांच्या रकमा परत मिळणेबाबत.

मा.जिल्हधिकारी साहेब यांना याबाबत निवेदन चिंचोडीपाटील येथील ठेवीदार व सामाजिक कार्यकर्ते च्या वतीने देण्यात आले. या बाबद सविस्तर वृत्त असे की

 

 

 

उपरोक्त विषयास अनुसरून आम्ही खाली सह्या करणारे आपणास विनंतीपूर्व निवेदित करतो की, श्रीनाथ मल्टीस्टेट अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसा.लि.शाखा-चिचोंडीपाटील येथे ९११ सभासदांनी आपल्या कष्टाच्या कमाईतून साठविलेली रक्कम, भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी, आरोग्य विषयक गरजेसाठी तसेच मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी सन २०१८-१९ पर्यंत वेळोवेळी मल्टीस्टेट मध्ये ठेवींच्या स्वरुपात गुंतवणूक केलेली होती.

परंतु या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाने केलेल्या गैरकारभारामुळे सदर संस्थेमध्ये असलेल्या ठेवींचे ते संरक्षण करू शकले नाहीत. स्वहितासाठी संचालक मंडळाने चुकीचे निर्णय घेऊन सभासदांच्या ठेवी नियमबाह्य वापरल्यामुळे संस्थेची आर्थिक अडचण निर्माण झाली व या सर्व कारणांमुळे ही संस्था सन २०१८-१९ मध्ये बंद पडली.

सन २०१८-१९ पासून आजपर्यंत सभासदांचा आर्थिक कारभार ठप्प झाला असून अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. काही ठेवीदार हा ताण सहन करू न शकल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. काहींना रक्तदाब, मधुमेह यांसारख्या शारीरिक व्याधी निर्माण झाल्या.ठेवीदारांच्या कुटुंबातील विद्यार्थी फी भरू न शकल्यामुळे उच्चशिक्षणापासून वंचित राहिले. अशा विविध स्वरूपाच्या अडचणींचा सामना सदर ठेवीदार व कुटुंबियांना करावा लागला.

तरी आपण संस्थेच्या व संचालक मंडळाच्या मालकीच्या असलेल्या स्थावर तसेच इतर प्रकारच्या मालमत्तांचा तातडीने लिलाव करून ठेवीदारांना त्यांचा आर्थिक मोबदला परत मिळवून देणे कामी मदत करावी.आपणास असलेल्या संपूर्ण अधिकारांचा वापर करून ठेवीदारांना योग्य न्याय देण्यात यावा या निवेदनात .

,

इंजि.प्रविण कोकाटे (मा.सभापती,पंचायत समिती,अहमदनगर)

शरद पवार (सरपंच, चिचोंडी पाटील)

प्रल्हाद खांदवे (उद्योजक) रघुनाथ दळवी.सुभाष नकुल.दिलीप पवार.बाळासाहेब पवार.जावेद आत्तार. यांच्यासह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे