बालवयातच भक्ती आणि ज्ञानशक्तीचे संस्कार हवेत…प्रा.बारगळ.
लोहगाव ( सत्तेचा महासंग्राम न्युज)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीविठ्ठल रुक्मिणी हे सामाजिक, आध्यात्मिक भक्ती आणि राष्ट्रीय एकतेचे प्रेरणास्थान आहे, त्यासाठी बालवयातच असे भक्ती आणि ज्ञानशक्तीचे संस्कार रुजले पाहिजेत, असे मत प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील महादेव मळ्यातील अड, रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचालित विद्यानिकेतन प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित आषाढी वारी शुभारंभ करताना प्रा. शिवाजीराव बारगळ बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे चेअरमन प्राचार्य टी.ई. शेळके यांनी आषाढी वारी उपक्रम आयोजित केल्याबद्दल संयोजकांना शुभेच्छा दिल्या. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आषाढी वारी आणि भक्तीसंस्कार यांचे महत्व सांगून संयोजिका शाळेच्या प्राचार्या चित्राताई सूरडकर यांचा प्रा. रायभान दवंगे लिखित ‘ दप्तर’ कथासंग्रह देऊन सत्कार केला. चित्राताई सूरडकर यांनी स्वागत करून आषाढी वारीचे महत्व व उपक्रम यांची माहिती दिली. प्रा. बारगळ यांनी शुभेच्छा देऊन ज्ञानशक्तीबरोबर भक्ती संस्कार वाढले तर मनोबल वाढेलं असे सांगितले. चित्राताई सूरडकर यांनी आभार मानले.