कारगिल ज्योतीसह कारगिल कलश शिर्डीत साई दरबारी! कॅप्टन भंडारी व सहकार्यानी कारगिल विजय दिवस साजरा करण्यापूर्वी शिर्डीत कारगिल कलशासह येऊन घेतले साई दर्शन!
शिर्डी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
कारगिलज्योतीसह कॅप्टन भंडारी व त्यांचे सहकार्यांनी शिर्डी भेट देऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले,
कारगिल विजय दिवस हा 1999 च्या पाकिस्तानसोबतच्या संघर्षात भारताच्या विजयाचे प्रतीक म्हणून दरवर्षी 26 जुलै रोजी साजरा केला जातो. तीव्र आणि प्रदीर्घ युद्धात भारतीय सैनिकांनी केलेल्या शौर्याचा आणि बलिदानाचा हा सन्मानाचा दिवस आहे. हा दिवस साजरा करणेपुर्वी दरवर्षी जुलै महिन्यात कॅप्टन भंडारी व त्यांचे सहकारी कारगिल विजय कलश घेवून शिर्डी येथे श्री साईबाबा समाधी मंदिरात भेट देत असतात. याही वर्षी कॅप्टन भंडारी हे आज सोमवार दि.२२ जुलै २०२४ रोजी आपल्या सहकाऱ्यांसह कारगिल विजय कलश घेवून शिर्डी येथे श्री साईबाबांचे समाधी मंदिरात दर्शन घेणेसाठी आले होते. त्यांनी हा कलश श्री साई समाधी जवळ ठेवला. तसेच श्री साईबाबांचे दर्शन घेतले.
त्यानंतर साई संस्थानच्या वतीने त्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शाल देऊन सत्कार केला.यावेळी अमर रहे ,अमर रहे, वीर जवान अमर रहे !!भारत माता की जय !!अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी संस्थानच्या प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे व कर्मचारी उपस्थित होते.