धनगरवाडी मध्ये बिबट्याचा धुमाकूळ वन विभागाने त्वरित पिंजरा लावण्याची मागणी….
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
राहाता (सत्तेचा महासंग्राम न्युज)
वनविभाग धनगरवाडी परिसरात पिंजरा निष्पापाचा बळी गेल्यावर लावणार का ?
राहाता तालुक्यातील धनगरवाडीत बिबट्याने दिवसाचं दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे धनगरवाडीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात दुपारी चार वाजे दरम्यान स्थानिक नागरिकांना बिबट्या दिसुन आल्याचे सांगितले जात आहे शनिवार असल्याने मुलांना सकाळची शाळा होती त्यामुळे शाळेमध्ये मुले नव्हती अन्यथा मुलांच्या जीविताला धोका झाला असता दोन महिन्यापूर्वी बिबट्याने अहिल्यादेवीनगर येथे रात्री नऊच्या दरम्यान दोन शेळ्या आणि एका कुत्र्यावर हल्ला केला होता त्यापैकी दोन्ही शेळ्या जागेवर गेल्या होत्या नंतर दुसऱ्या दिवशी रक्टे वस्ती येथे एका शेळीवर हल्ला केला होता त्याच वेळेस ती मरण पावली धनगरवाडी मध्ये आतापर्यंत बिबट्याने आता पर्यंत पंधरा ते वीस कुञ्यांचा फडशा पाडला आहे आणि दहा दिवसापूर्वी वाकडी दिघी रस्त्यावर बिबट्याने एका मोटरसायकल वर हल्ला चढवत आशा सोनवणे या महिलेस जखमी केले होते तरी पती गोरक्षनाथ सोनवने यास किरकोळ जखमी केले होते तेथे जवळच वस्ती वरील माणसे मदतीला धावल्याने पुढिल अनर्थ टळला तरी धनगरवाडी सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी वेळोवेळी पिंजऱ्याची मागणी करूनही वन विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे वन विभागाने धनगरवाडी मध्ये त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांमधुन होत आहे