प्राईड अकॅडमीच्या चिमुकल्यांच्या विठ्ठल नामाच्या गजराने भोकर नगरी दुमदुमली
टाकळीभान:(सत्तेचा महासंग्राम न्युज)
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे टाकळीभान प्राईड अकॅडमी प्री स्कूलच्या चिमुकल्यांनी आषाढी एकादशीनिमित्त बाल दिंडी व वृक्षदिंडी काढून पर्यावरणाचा अनोखा संदेश ही दिला. टाकळीभान प्री स्कूलच्या या चिमुकल्यांच्या विठू माऊलीच्या गजराने अवघी भोकर नगरी दुमदुमून गेली. यावेळी कार्यक्रम प्रसंगी माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर मुरकुटे, संस्थेच्या संस्थापिका मा. सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, गावातील सरपंच शितलताई पटारे, भिकाजी पोखरकर, दिलीप पटारे, सुदाम पटारे, प्रताप पटारे,उपसरपंच सागर आहेर, रामदास शिंदे, बाळासाहेब पटारे व पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते. यावेळी गावातील मान्यवरांनी या बाल दिंडी व वृक्ष दिंडीचे उस्फूर्तपणे स्वागत केले. यावेळी चिमुकल्यांनी जगदंबा मातेच्या प्रांगणामध्ये रिंगण सोहळा केला तसेच विठू माऊलीची भक्तीगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विठ्ठल – रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, निवृत्ती, नामदेव, सोपान मुक्ताई, संत तुकाराम महाराज, संत गोरोबा,वारकरी, भजनी यांच्या सुरेख वेशभूषा परिधान केल्याने वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी कार्यक्रम प्रसंगी चिमुकल्यांनी इंग्रजी भाषेमध्ये आषाढी एकादशीची महती सांगितली. व प्राईड अकॅडमीच्या प्रगतीच्या वाटचालीचा परिचय करून दिला. यावेळी चिमुकल्यांचा सहभाग व उत्साह पाहून भोकर येथील पदाधिकारी व ग्रामस्थ भारावून गेले. यावेळी विठ्ठल रुक्मिणी वेशभूषा धारण केलेल्या विद्यार्थ्यांचे पूजन सरपंच सौ.शितल पटारे व काकासाहेब पटारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच शितल पटारे, ज्येष्ठ ग्रामस्थ बाबा पोखरकर, सुदाम पटारे, यांनी मनोगत व्यक्त करून प्राईड अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. मा. सभापती व प्राईड अकॅडमीच्या संस्थापिका डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी प्रास्ताविक करून प्राईड अकॅडमी या शैक्षणिक संस्थेच्या वाटचालीविषयी थोडक्यात माहिती सांगितली. याप्रसंगी भोकर येथील सरपंच शितल पटारे,प्रताप पटारे, उपसरपंच सागर आहेर, भिकाजी पोखरकर,दिलीप पटारे, सुदामराव पटारे, बाळासाहेब पटारे ,भाऊसाहेब पटारे , रामदास शिदे, चंदकांत झुरंगे, हरिभाऊ बिडवे, सूर्यभान शेळके , एकनाथ लोखडे , अक्षय मांजरे, ,राहुल अभंग, संदीप गांधले, डॉ. नरेश चोरडिया,मधुकर वाकडे, दिनकर कोल्हे, गंगा गायकवाड, निवृत्ती विधाटे, कचरू वाकडे,निखिल कांबळे,वाल्मीक जाधव, बाबुराव तागड, प्रतीक कांबळे, सम्राट माळोदे, पोपट पटारे, विजय अमोलिक, आदींसह प्राईड अकॅडमीचे स्कूलचे प्राचार्य शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी,पालक आदी सह गावातील मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचे आभार माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी मानले.
.