ब्रेकिंग
दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे पत्रकार अर्जुन राऊत व जळगाव येथील पत्रकार संजय महाजन यांच्यावर हल्ला करणाऱ्या कठोर कारवाई करावी
0
9
1
3
8
2
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
श्रीरामपूर: टाकळीभान येथील दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे पत्रकार अर्जुन राऊत व जळगाव येथील पत्रकार संजय महाजन यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार हल्ला विरोधी कायद्यानुसार कठोर कारवाई करावी या अशायाचे निवेदन श्रीरामपूर शहर व ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने श्रीरामपूर पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे यांना देण्यात आले आहे.
याप्रसंगी पोलीस उपाधीक्षक शिवपूजे यांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले, प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष रमेश कोठारी, मनोज आगे (दै.जय बाबा), प्रदीप आहेर( वृत्त संपादक दैनिक राष्ट्र सह्याद्री), संतोष बनकर(उपसंपादक दै. पुण्यनगरी), पत्रकार दिलीप लोखंडे,पत्रकार संदीप मोरगे, पत्रकार शाफिकभाई बागवान, पत्रकारअर्जुन राऊत,संतोष बनसोडे , पत्रकार अनिता तडके आदीसह संपादक व पत्रकार उपस्थित होते.
0
9
1
3
8
2