ग्रामसेवक संघटनेने बांधकाम कामगारांना 90 दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यास सहमती दर्शवल्यामुळे अध्यक्ष आर ,एफ, जाधव चा सत्कार
टाकळीभान( प्रतिनिधी)
ग्रामसेवक संघटनेने बांधकाम कामगारांना ग्रामसेवकांनी 90 दिवस काम केलेच प्रमाणपत्र देण्यास समती दिल्याबद्दल, ग्रामसेवक संघटनेचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष आर ,एफ ,जाधव, यांचा बांधकाम संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे ,
बांधकाम कामगार ग्रामसेवकाने 90 दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र देणे बंद केले होते ,परंतु आपल्यासह अनेक संघटनानी जिल्हा परीषेद अहमदनगर चे सी ओ साहेब यांनी पंचायत समिती चे बी डी ओ साहेबांना आदेश देवुनही कार्यवाही होत नव्हती, परंतु आम्ही ग्रामसेवक संघटनेला विंनती केल्याने संघटनेने 90 दिवसाचे प्रमाणपत्र देण्याचे मान्य केल्याने, तसेच श्रीरामपुर तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना सुचना केल्याने,
श्रीरामपुर तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष आर, एफ, जाधव, यांचा इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या वतीने सत्कार करतांना कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेशभाऊ छल्लारे , सचिव प्रताप लोखंडे, उपसरपंच कानोबा खंडागळे, भाजपच्या महिला जिल्हा सरचिटणीस सुप्रिया धुमाळ,भारत गुंजाळ, रन्नवरे मामा , सागर अमोलिक , सागर वमने, प्रकाश मुळे, गजानन लोखंडे ,शरद गायकवाड ,अमोल गायकवाड, अनिल खंडागळे ,शिवाजी पवार ,संजय कोकणे मोहन कुमावत , पडवळ, जमिर शेख, अकाश आस्वले, अर्जुन कुमावत यांच्यासह अनेक बांधकाम कामगार उपस्थित होते.