साई संस्थांनमधील 598 कर्मचारी आणि आऊटसोर्सिंग मधील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याचा सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय! पालकमंत्री ना.विखे पा. यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना संस्थान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उपस्थितीत देण्यात आले नियुक्त पत्र!
शिर्डी (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी येथील
श्री साईबाबा साईबाबा संस्थान मधील सुमारे ५९८ कर्मचारी आणि आउटसोर्सिंग मधील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला. त्यासाठी पाठपुरावा करणारे नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील तसेच संस्थांनच्या अधिकाऱ्यांचेही या कर्मचाऱ्यांमधून अभिनंदन करत त्यांना धन्यवाद देण्यात येत आहेत.
साईसंस्थानच्या त्रिसदस्यीय समितीने सरकारात्मक अंमलबजावणी करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. आज मंगळवारी या ऐतिहासिक निर्णयाचे नियुक्तीपत्र महसुल तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांना सुपूर्त करण्यात आले. या कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा यावेळी झाला होता. शिर्डी येथील श्री साई संस्थान मधील 598 व आउट सोर्सिंग कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याबाबत
गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करत होतो. शिवाय दरम्यानच्या काळात कर्मचाऱ्यांचा संघर्षही मोठा झाला. अशा सर्व परिस्थितीत कामगारांना न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला होता. त्याची वचनपूर्ती आजच्या या निर्णयाने करता आल्याचे मला समाधान वाटत आहे. असे राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी काही मान्यवरांचीही भाषणे झाली.
शिर्डीत या कर्मचाऱ्यांना नुकतेच नामदार विखे पा. व संस्थान आधिकारी व मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.नियुक्ती पत्र देण्याच्या कार्यक्रमास साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्षनाथ गाडीलकर, उपकार्यकारी अधिकारी श्री. तुकाराम हुलहूले, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. बाळासाहेब कोळेकर, तसेच मा. खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, सभापती श्री. ज्ञानेश्वर गोंदकर, माजी नगराध्यक्ष श्री. कैलास कोते, श्री. अभय शेळके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री.कमलाकर कोते, कामगारांच्या पतसंस्थेचे चेअरमन श्री. तुकाराम पवार यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कायम झालेल्या साईसंस्थान कर्मचाऱ्यांमधून मोठा आनंद व्यक्त होत आहे.