टाकळीभान येथील व्यापाऱ्याच्या गाळ्यात चोरी
टाकळीभान( प्रतिनिधी)
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील उपबाजार आवारातील व्यापारी विजय पंढरीनाथ बिरदवडे यांचे विजय ट्रेडिंग कंपनी म्हणून कांद्याचे अडत दुकान आहे. १९ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे ते आपले दुकानात बंद करून गेले असता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या दुकानावर गेले असता त्यांना त्यांना त्यांचे कांदा आडत दुकान फोडलेले दिसले, यामध्ये कांद्याचा वजन काटा किंमत सुमारे १८५००/-मोकळ्या कांद्याच्या 200 गोण्या किंमत अंदाजे २०००/- चोरीस गेले असून दुकानाच्या गाळ्याचे मोठे फ्लेक्स बोर्ड फाडून चोरट्यांनी काढून नेले,तसेच दुकानातील फर्निचर ची तोडफोड करून नुकसान केले. दुकानातील वस्तूची ही चोरी करण्यात आली आहे. यानुसार व्यापारी विजय बिरदवडे यांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
टाकळीभान उपबाजार आवार हे श्रीरामपूर तालुक्यातील मोठे उपबाजार आवार केंद्र असून व्यापाऱ्यांच्या गाळ्यांना कोणती सुरक्षा मार्केट कमिटीने केली नाही. सीसीटीव्ही कॅमेरे ही येथे नसल्याने भविष्यामध्ये येथे चोऱ्यांची संख्या वाढू शकते. तसेच येथील व्यापाऱ्यांनी मार्केट कमिटीच्या गा मध्ये व गोडाऊन मध्ये ठेवलेल्या शेत मालालाही धोका चोरट्यांपासून होऊ शकतो. या अगोदरही मार्केट कमिटीच्या गाळ्यातील किराणा दुकानदार व्यवसायिकांच्या चोऱ्या झालेल्या आहेत. तरी मार्केट कमिटीने याची दखल घेऊन गाळेधारकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच रात्रीसाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी व्यापारी व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.