Breaking
संपादकीय

ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेने सफाई कामगारांच्या वेदनांवर पांघरून टाकण्याचे काम केले… सागर वैद्य,

0 9 1 3 8 0

 

 

टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)

टाकळीभान येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेने सफाई कामगारांना उपयोगी वस्तू वाटून स्तुत्य उपक्रम राबवला असून सफाई कामगारांच्या वेदनांवर पांघरून टाकण्याचे काम केले आहे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर सदस्य सागर वैद्य यांनी ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभान च्या वतीने सफाई कामगारांना साहित्य वाटप व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पाहण्यासाठी कार्यक्रम प्रसंगी केले केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महापालिकेचे मा. आरोग्य अधिकारी ऍड. प्रमोद तावरे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर तालुक्याचे आ. लहू कानडे, रोहित वाकचौरे, मा.सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, जल अभ्यासक भिला सोनू पाटील, जि. प. सदस्य रामहरी कातोरे, निसर्ग व पर्यावरण मंडळाचे प्रा. डॉ. अनिल लोखंडे सर, शिवसेनेचे ( उबाठा) गट तालुका अध्यक्ष राधाकिसन बोरकर, संगमनेर खरेदी-विक्री संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे, मा. उपसरपंच राजेंद्र कोकणे, अशोकचे संचालक शिवाजीराव शिंदे, सोसायटीचे चेअरमन एकनाथ पटारे, ह. भ.प.दत्तात्रय बहिरट महाराज, प्रा. जयकर मगर, श्रीधर गाडे, सदाशिव पटारे, निखिल पवार, ओंकार स्वामी जंगम आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना वैद्य म्हणाले की आजच्या पिढीने पैसा धनसंपत्ती कमवावी परंतु आपली येणारी पिढी सुसंस्कारित व चांगल्या विचाराची नसेल आपल्या साधन संपत्तीचा काही उपयोग नाही. मोबाईल युग तसेच स्पर्धा व धावपळीच्या युगामध्ये पालकांनी आपल्या मुलांना वेळ द्यावा, त्यांना चांगले संस्कार द्यावे.भारत देश एकमेव अशी भूमी आहे ज्या ठिकाणी प्राचीन काळापासून संस्काराला महत्त्व दिले जात असल्यामुळे आपल्या देशाने आतापर्यंत कोणावरही आक्रमण केले नाही. तो संस्काराचा वारसा व विचार आपण पुढे न्यायचा आहे. असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर तावरे यांनी आरोग्य विषयी उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन करून संत गाडगेबाबाच्या आदर्श विचारांचे विश्लेषण केले.प्रास्ताविक राजेंद्र कोकणे यांनी करून संस्थेच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी मा. सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, रोहित वाकचौरे यांनी कार्यक्रमात शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीरामपूर तालुक्यातील महिला व पुरुष सफाई कामगारांना उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.तदनंतर नंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती ,संस्था यांना शैक्षणिक, सामाजिक, साहित्य, कला,क्रीडा ,सांस्कृतिक,वैद्यकीय, शासकीय सेवा, आदर्श सरपंच, उपसरपंच, आदर्श पोलीस पाटील राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी भोकरचे सरपंच काकासाहेब पटारे, सुदाम पटारे, शिवाजी दौंड ,बाबासाहेब कुसेकर, नानासाहेब जगदाळे, आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर, नागरिक, सफाई कामगार महिला,पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत, उपाध्यक्ष संदीप पटारे, भैया पठाण ,अक्षय कोकणे, सुदामराव पटारे, रवी पटारे, दिगंबर मगर, योगेश माकोने ,रवींद्र राऊत,रामेश्वर शिंदे, यांनी परिश्रम घेतले.

 

चौकट: जर्मन बरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याने करार केला असून तेथील भाषा शिकणाऱ्या युवकांना पाच लाख रोजगार व नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, त्यामुळे युवकांना भविष्यात आणखी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. सागर वैद्य- मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे