ना. राधाकृष्ण विखे पाटील जन्मदिवस शाळेतील शिपायाने विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देत केला साजरा
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
प्रतिनिधी बाळकृष्ण भोसले
राहुरी : तालुक्यातील चिंचोली येथील पद्मभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पा. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या स्व. जनार्दन काळे पा. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांचा ६४ वा वाढदिवस विद्यालयाचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी संतोष कटारिया यांनी विद्यार्थ्यांना मिष्टान्न देत साजरा केला. या उपक्रमाचे तालुक्यातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे
प्रवरा परिसराच्या कार्यक्षेत्रातील राहुरी तालुक्यातल्या चिंचोली या गावात पद्मभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या स्व. जनार्दन काळे पा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे यांचा ६४ वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला त्यात वृक्षारोपण, सामाजिक प्रबोधन, स्वच्छता कार्यक्रम, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, बेटी बचाव बेटी पढाव जागृती आदी उपक्रम मुख्याध्यापक सुधाकर गोरे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आले विद्यालयाची यशस्वी परंपरा टिकवून ठेवत जवळपास सात आठशे विद्यार्थी आज या विद्यालयात शिक्षण घेत आहेत
प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पाचवी मधील नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबाचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर मोफत पाठ्यपुस्तके वितरण व गणवेश वाटप करण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक श्री अशोकराव गागरे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ.लीलावती सरोदे उपस्थित होत्या
कार्यक्रमास स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष शंकर लाटे, सरपंच गणेश हारदे, संभाजी दादा आरगडे, संजू शेठ राका, बंटी लाटे, दिलीपराव दाढकर, रायभान नलगे, सर्जेराव सोनवणे, माजी मुख्याध्यापक प्रभाकर लोखंडे सर यांचेसह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित आ
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य सुधाकर गोरे यांनी केले ,सूत्रसंचालन सौ. लांघी तर आभार प्रदर्शन श्री गिरी सर यांनी केले