Breaking
ब्रेकिंग

झिका व डेंगूसदृश्य आजारापासून नागरिकांनी सावधानता बाळगावी

0 9 1 3 8 2

 

टाकळीभान( प्रतिनिधी )

झिका या डेंगूसदृश आजारापासून नागरिकांनी सावधानता बाळगावी, व त्याची लक्षणे आढळून आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन माळ वाडगाव व टाकळीभान येथील वैद्यकीय अधिकारी डॉ, उन्मेश लोंढे व डॉ. राम बोरुडे यांनी केली आहे.

झिका आजार हा विषाणूजन्य आजार असून एडीस डासाच्या मार्फत त्याचा फैलाव होतो.

या आजाराची लक्षणे सर्वसाधारण डेंगू आजारासारखीच असतात यामध्ये ताप येणे ,अंगावर लाल पुरळ येणे, डोकेदुखी ,अंगदुखी ही लक्षणे आढळतात ही लक्षणे सौम्य प्रकारचे असतात त्यामुळे शक्यतो रुग्णालयात जाण्याची गरज भासत नाही, परंतु पाच-सहा दिवसाच्या पुढे निरंतर ही लक्षणे सुरू असतील तर नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एडीस डासामार्फत डेंगू ,चिकन गुण्या, पिवळा ताप हे सुद्धा आजार पसरतात त्यामुळे याला वेळीच प्रतिबंध करणे आवश्यक आहे त्यासाठी आरोग्य विभागाने ज्या रुग्णांना ताप , अंगदुखी व इतर लक्षणे आहे त्यांना वेळीच डॉक्टर कडे दाखवावे तसेच

या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी डास फवारणी, आपल्या भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे, व इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी.  अशी माहिती माळ वडगाव व टाकळीभान आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ उन्मेश लोंढे व डॉ. राम बोरुडे यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे