सख्ख्या मावस व मामेभावानेच केला अल्पवयीन मुलीवर सलग आठ वर्षे अत्याचार, चीड आणणारी घटना, कुठे घडली वाचा
सख्ख्या मावस व मामेभावानेच केला अल्पवयीन मुलीवर सलग आठ वर्षे अत्याचार, चीड आणणारी घटना, कुठे घडली वाचा
राहुरी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
सलग आठ वर्षापासून अल्पवयीन पीडितेवर सख्या मामेभाऊ व मावसभावानेच अत्याचार केल्याची घटना राहुरी तालुक्यात घडली असल्याने तालुक्यात संताप व्यक्त होत आहे दरम्यान एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
सन २०१६ पासून ते एप्रिल २०२४ पर्यंत राहुरी तालुक्यातील पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी दिवाळीच्या सुट्टीत, उन्हाळ्याच्या सुट्टीत तिचा सख्खा मामेभाऊ ऋषिकेश पांडुरंग धोंडे वय २५ वर्ष व तिचा सख्खा मावस भाऊ सतीश टकले यांनी मिळून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले तसेच मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग करून तिला वेळोवेळी ब्लॅकमेल केले व गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर जबरीने संभोग करून मामेभाऊ ऋषिकेश धोंडे यांनी आळंदी पुणे येथे जाऊन तिच्याशी जबरीने लग्न केले त्यानंतर तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर I१५१२/२०२४ भादंवी कलम ३७६,३७६(२) (n)३७६(d )३६६,३५४,३०७,३२४,३२३,५०४,५०६,३४, सह पोस्को अधि. कलम ८ ११ १२ प्रमाणे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता .
त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक खोंडे हे करत होते सदर तपासात आरोपी ऋषिकेश पांडुरंग धोंडे वय २५ वर्ष याला बीड जिल्ह्यातून शिताफिने ताव्यात घेण्यात आले आहे व त्यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर आरोपींना न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे . सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. कलुबरमे, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शना खाली प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोसई सी आर खोंडे, सहाय्यक फौजदार भराटे ,पोहेकॉ पालवे, सुरज गायकवाड, राहुल यादव, पो.कॉ प्रमोद ढाकणे, सचिन ताजने, नदीम शेख, इफ्तेखार सय्यद, अंकुश भोसले, सतीश कुराडे, गोवर्धन कदम, गोपनीयचे अशोक शिंदे, पोलीस नाईक सचिन धानंद, यांनी केली आहे.